Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,17,121
Recovered:
56,54,003
Deaths:
1,12,696
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,390
575
Maharashtra
1,47,354
9,350

कशासाठी, तर चाहत्यांच्या प्रेमासाठी - तेजश्री प्रधान

'होणार सून मी या घरची' या मालिकेत जान्हवीच्या रूपात नावारूपाला आलेली अभिनेत्री तेजश्री प्रधान पुन्हा एकदा छोट्या पडद्याकडं वळली आहे. चाहत्यांच्या प्रेमाखातर छोट्या पडद्यावर पुनरागमन करत असल्याचं तेजश्रीचं म्हणणं आहे.

कशासाठी, तर चाहत्यांच्या प्रेमासाठी - तेजश्री प्रधान
SHARES

'होणार सून मी या घरची' या मालिकेत जान्हवीच्या रूपात नावारूपाला आलेली अभिनेत्री तेजश्री प्रधान पुन्हा एकदा छोट्या पडद्याकडं वळली आहे. चाहत्यांच्या प्रेमाखातर छोट्या पडद्यावर पुनरागमन करत असल्याचं तेजश्रीचं म्हणणं आहे.


प्रोमो रिलीज 

मालिका, नाटक आणि चित्रपट या तीनही माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करून त्यांच्या मनात एक वेगळंच स्थान निर्माण करणारी अभिनेत्री तेजश्री प्रधान झी मराठी वाहिनीवरील 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. तेजश्री सोबतच या मालिकेत निवेदिता सराफ, रवी पटवर्धन आणि गिरीश ओक हे प्रमुख भूमिका साकारताना दिसतील. दिग्गज कलाकारांचा मेळ असलेली ही मालिका नक्कीच रंजक असेल यात शंकाच नाही. नुकतंच या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आणि या प्रोमोमुळे प्रेक्षकांची मालिकेबद्दलची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.


छोट्या पडद्यावर पुनरागमन

छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्याबद्दल तेजश्री म्हणाली की, एक काळ असा होता जेव्हा मी नाटक, मालिका आणि चित्रपट एकत्र करत होते. माझ्या अनेक चाहत्यांना मला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहायचं होतं आणि त्यांनी तशी इच्छा देखील माझ्याकडे व्यक्त केली होती. चाहत्यांच्या प्रेमामुळेच मी पुन्हा एकदा टेलिव्हिजनकडे वळल्याचं आवर्जून सांगेन. मोठ्या पडद्यावर मी साकारलेल्या सर्वच व्यक्तिरेखांवर प्रेक्षकांना भरभरून प्रेम केलं आहे. 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेतील व्यक्तिरेखाही अशीच प्रेक्षकांच्या मनात घर करणारी असल्यानं त्यांना ती नक्कीच आवडेल अशी आशाही तेजश्रीनं व्यक्त केली आहे.


२२ जुलै रोजी भेटीस

'अग्गंबाई सासूबाई' ही मालिका २२ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ही एक हलकी फुलकी मनोरंजक मालिका असणार आहे. या मालिकेत पुन्हा एकदा सासू-सुनेचं नातं पहायला मिळणार असल्याचे संकेत शीर्षकासोबतच प्रसारीत झालेल्या प्रोमोजमधून जाणवतं. या मालिकेत तेजश्रीच्या सासूंची भूमिका निवेदिता सराफ साकारत आहेत. त्यांचंही या मालिकेच्या निमित्तानं छोट्या पडद्यावर पुनरागमन झालं आहे. या मालिकेत निवेदिता यांच्यासोबत आपलं एक अनोखं नातं जोडलं गेलं असून आमची केमिस्ट्री प्रेक्षकांनाही मोहित करणारी असल्याचं मत तेजश्रीनं व्यक्त केलं आहे.हेही वाचा-

केव्हीआर ग्रुपमधील मतभेद संपता संपेना !
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा