Advertisement

चेंबूर पोलीस ठाण्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा


चेंबूर पोलीस ठाण्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
SHARES

चेंबूर - दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील चेंबूर पोलीस ठाणे आणि पूर्व प्रादेशिक विभागाच्या अप्पर पोलीस आयुक्त कार्यालायात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. चेंबूर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिप डाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर चेंबूर पोलीस ठाण्याच्या बाजूला असलेल्या पूर्व प्रादेशिक विभागाच्या अप्पर पोलीस आयुक्त कार्यालायाबाहेर अप्पर पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. या दोन्ही ठिकाणी पोलिसांसह परिसरातील रहिवाशांनी या कार्यक्रमात मोठया संख्येने सहभाग घेतला होता. पालिका अधिकारी आणि काही रहिवाशांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. या वेळी सहाय्यक आयुक्त हर्षद काळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना भेटवस्तू आणि खाऊचे देखील वाटप करण्यात आले.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा