Advertisement

न्यू इयरला एमआयजी क्लबतर्फे म्युझिकल ट्रिट


न्यू इयरला एमआयजी क्लबतर्फे म्युझिकल ट्रिट
SHARES

तुमचं न्यू इयरचं प्लॅनिंग झालं की नाही? न्यू इयरला अवघे काही तास उरलेत. पण न्यू ईयरचं नेमकं सेलिब्रेशन करायचं तरी कुठे? या पेचात तुम्ही अडकला आहात का? तर मग या कॉन्सर्टला तुम्ही यायलाच हवं. ही कॉन्सर्ट आहे गायक आणि संगीतकार अवधुत गुप्ते यांची.


नक्की काय आहे कॉन्सर्ट?

बॉलिवूड गाणी ऐकायला तुम्हाला आवडतात का? मग ही कॉन्सर्ट तुमच्यासाठीच आहे. बॉलिवूडमधली एक सो एक गाणी तुम्हाला या कॉन्सर्टमध्ये ऐकायला मिळणार आहेत! एमआयजी क्लबतर्फे या कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलं आहे. वांद्रेतल्या एमआयजी ग्राऊंडवर संध्याकाळी ७ वाजता ही कॉन्सर्ट रंगणार आहे.

अवधुत गुप्ते यांनी मराठी आणि हिंदीमध्ये अनेक गाणी गायली आहेत. पाऊस या अल्बममार्फत गायक आणि संगीतकार म्हणून अवधुत गुप्तेंनी म्युझिक इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. अवधुत गुप्तेंचा 'ऐका दाजिबा' हा अल्बम सुपर हिट ठरला होता.


इथं करा तिकिट बुक

'मेलोडियस न्यू इयर आय' या कॉन्सर्टची तिकिटं बुक करण्यासाठी तुम्ही एमआयजी क्लब ऑफिसशी संपर्क साधू शकता. यासाठी तुम्ही 91 - 22 2640 8899 / 6907 / 6912, 91 - 22 2643 6594 / 2645 / 7108 / 7109 या नंबरवर संपर्क साधू शकता.


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा