स्नेहांकीत हेल्पलाइन संस्थेचा स्वयंसेवक दिन साजरा

 Dadar
स्नेहांकीत हेल्पलाइन संस्थेचा स्वयंसेवक दिन साजरा
स्नेहांकीत हेल्पलाइन संस्थेचा स्वयंसेवक दिन साजरा
स्नेहांकीत हेल्पलाइन संस्थेचा स्वयंसेवक दिन साजरा
स्नेहांकीत हेल्पलाइन संस्थेचा स्वयंसेवक दिन साजरा
See all

दादर - स्नेहांकीत हेल्पलाइन संस्थेचा स्वयंसेवक दिन दादर पूर्व येथील कमला मेहता अंध विद्यालयात 18 डिसेंबरला साजरा करण्यात आला. या संस्थेसाठी काम करणाऱ्या विद्यार्थी स्वयंसेवकांना उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं. या वेळी संस्थेच्या अध्यक्षा परिमाला भट, डॉ. अंबुजा साळगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

ज्या विदयार्थ्यांकडे शिक्षण घेण्यासाठी पुस्तकं उपलब्ध नाहीत अशा विदयार्थ्यांना सीडी रेकॉर्डिंगच्या माध्यमातून शिक्षण देण्यात येत असल्याचं संस्थेच्या अध्यक्षा परिमाला भट यांनी सांगितले. या सर्व कामात विविध महाविद्यालतील 100 हून अधिक विद्यार्थी आपले सामाजिक कर्तव्य म्हणून फावल्या वेळेत स्वयंसेवक म्हणून संस्थेला मदत करतात. याच स्वयंसेवक विद्यार्थ्यांचा गेल्या 6 वर्षांपासून संस्थेच्या वतीने गौरव करण्यात येतो.

Loading Comments