Advertisement

स्वाध्याय परिवारातल्या निर्मलाताईंचे निधन


स्वाध्याय परिवारातल्या निर्मलाताईंचे निधन
SHARES

ठाणे - स्वाध्याय परिवाराचे प्रणेते परम पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या पत्नी श्रीमती निर्मलाताई आठवले यांचे निधन झाले. सोमवारी साधारण 5 वाजण्याच्या सुमारास ठाणे येथील तत्त्वज्ञान विद्यापीठातील त्यांच्या घरी दु:खद निधन झाले. त्या 90 वर्षांच्या होत्या. बुधवारी संध्याकाळी 5 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

निर्मलाताईंचा जन्म 3 ऑगस्ट 1926 ला राजापूर तालुक्यात झाला. पांडुरंगशास्त्री आठवले यांच्याशी विवाह झाल्यानंतर निर्मलाताईंनी त्यांच्या कार्यास हातभार लावला. स्वाध्याय कार्यात निर्मलाताईंचे मोठे योगदान होते. स्वाध्याय कार्यातील बंधु-भगिनींसाठी त्यांचे मोलाचे मार्गदर्शन कायम लाभत होते. दादांच्या निधनानंतर ताई ठाणे येथील तत्त्वज्ञान विद्यापीठात वास्तव्याला होत्या. तेथेच त्या स्वाध्यायी बंधुभगिनींना मार्गदर्शन करत. लाखो स्वाध्यायींसाठी मातृवत असलेल्या ताईंच्या अचानक जाण्याने परिवारावर शोककळा पसरली आहे.

निर्मालाताईंचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी तत्त्वज्ञान विद्यापीठात ठेवण्यात आले आहे. 31 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दुपारी चारपर्यंत ताईंचे अंत्यदर्शन घेता येईल. 1 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात येतील अशी माहिती स्वाध्याय परिवाराकडून देण्यात आली आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा