प्रयासचा वर्धापन दिन


  • प्रयासचा वर्धापन दिन
  • प्रयासचा वर्धापन दिन
SHARE

परळ - प्रयास या सामाजिक संस्थेचा पहिला वर्धापनदिन मंगळवारी परळ येथे झाला. वर्षभरापूर्वी मुंबई मधल्या काही महाविद्यालयीन तरुणांनी एक छोटसं समाज कार्य करता यावं या हेतूने प्रयास या संस्थेची स्थापना केली. वर्षभरात तब्बल 25 आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन प्रयासच्या कार्यकर्त्यांनी शिक्षणासंदर्भात आदिवासी मुलांना मदत केली आहे.

महाराष्ट्रात वर्षभर हा उपक्रम राबवत असतानाच त्यांनी परळच्या टाटा कँसर रुग्णालयात दाखल असणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना महिन्यातून 2 सोमवारी अन्नदान करण्याचा निर्णय घेतला. ते किमान एका वेळी 100 लोकांना अन्नदान करण्याचा प्रयत्न करतात. संस्थेला 17 जानेवारीला 1 वर्ष झाल्यानंतर नरेपार्कच्या महापालिका शाळेतील 35 खास विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धाही आयोजित केली होती.

संबंधित विषय
ताज्या बातम्या