Advertisement

पीओपीच्या गणेश मूर्तीवरवरील बंदी उठवण्याची मूर्तिकारांची मागणी

येत्या काही दिवसांत माघी गणेशोत्सव मुंबईसह राज्यभरात साजरा करण्यात येणार आहे. माघी गणेशोत्सवानिमित्त मुंबईतील अनेक मूर्तीकारांनी तयारीला सुरूवात केली आहे.

पीओपीच्या गणेश मूर्तीवरवरील बंदी उठवण्याची मूर्तिकारांची मागणी
SHARES

येत्या काही दिवसांत माघी गणेशोत्सव मुंबईसह राज्यभरात साजरा करण्यात येणार आहे. माघी गणेशोत्सवानिमित्त मुंबईतील अनेक मूर्तीकारांनी तयारीला सुरूवात केली आहे. परंतू, यंदा या मूर्तीकारांना बाप्पाला घडवण्यापूर्वी एका विघ्नाचा सामना करावा लागत आहे. 'प्लास्टर ऑफ पॅरिस'च्या गणेश मूर्तीवरवरील बंदीमुळं हे मूर्तीकार चिंतेत आहेत. त्यामुळं 'पीओपी बंदीला स्थगिती द्यावी आणि मूर्ती व्यवसायाला दिलासा द्यावा', अशी मागणी मूर्तीकारांनी केली आहे.

३१ डिसेंबर २०२० पर्यंत स्थगित केलेली ‘पीओपी’वरील बंदी १ जानेवारीपासून पुन्हा लागू करण्यात आली आहे. माघी गणेशोत्सव अवघ्या एका महिन्यावर आल्यानं या बंदीला आणखी काही काळ स्थगिती मिळावी, असं मूर्तिकारांचं मत आहे. १५ फेब्रुवारीला असलेल्या माघी गणेशोत्सवानिमित्त गणेश भक्तांकडून ‘पीओपी’च्या गणेशमूर्तीची मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे. मात्र, ‘पीओपी’च्या मूर्तीमुळे कारवाई होईल, अशी भीती मूर्तीकारांमध्ये आहे.

या संदर्भात मूर्तीकार संघाचे अध्यक्ष अण्णा तोंडवळकर लवकरच केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेणार आहेत. माघी गणेशोत्सवात मुंबईत साधारण साडेतीन हजारांहून अधिक सार्वजनिक तर १० हजारांच्या आसपास घरगुती गणपती असतात. सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीनंही यासंदर्भात जावडेकर यांना स्थगितीचं निवेदन दिलं होतं. परंतु, अद्याप त्याचं कोणतंही उत्तर मिळालेलं नाही. त्यामुळं पीओपीच्या गणेश मूर्तीला परवानगी मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये पीओपीला लाकडाचा भुसा, झाडांचे टाकाऊ अवशेष असे काही पर्यावरणपूरक पर्याय देण्यात आले आहेत. परंतु त्यांची उपलब्धता आणि किंमत ही सामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने मूर्तीकारांना त्याचा अवलंब करणे शक्य नाही. एवढेच नव्हे तर शाडूची माती मिळवतानाही मूर्तीकारांना अनेक अडचणी येतात. मातीच्या मूर्तीही ठराविक उंचीतच घडू शकतात. मंडळांना हव्या असलेल्या उंच आणि टिकाऊ मूर्तींसाठी 'पीओपी'ला पर्याय नाही. तो पर्याय सरकारने उपलब्ध करून दिला तर पर्यावरणपूरक मूर्तींचा विचार करता येईल, अशी भूमिका मूर्तिकारांनी मांडली आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा