Advertisement

फुटबॉल मॅनेजर कोर्समध्ये 48 विद्यार्थी उत्तीर्ण


फुटबॉल मॅनेजर कोर्समध्ये 48 विद्यार्थी उत्तीर्ण
SHARES

फुटबॉल मॅनेजमेंट काेर्समध्ये एकूण 48 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 'ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन'तर्फे पहिल्यांदाच हा कोर्स घेण्यात आला होता. यामध्ये नैवेद्य परमार्थ आणि भाव्या जैन सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. हिमांशू शर्मा आणि डोनाटो पावेरी यांनी रौप्यपदक मिळवले. ट्रॅव्हर फर्नांडिस, आयुष्यमान नारायण, सुर्या प्रकाश आणि लिन्डन डिपेन्हा यांनी कांस्यपदक मिळवले. मुंबईतील एका कार्यक्रमात हे पुरस्कार देण्यात आले. 

देशातील फुटबॉलचा स्तर उंचावण्यासाठी आपल्याला प्रशिक्षित फुटबॉल मॅनेजर्सची गरज आहे. यामध्ये हे तरुण मुले आणि मुली नक्कीच आपले कौशल्य दाखवून देतील, असे 'ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन'चे जनरल सेक्रेटरी कुशल दास यांनी सांगितले.


देशात फुटबॉलचे व्यावसायिकरण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमच्या प्रयत्नांना यशही मिळत आहे. अशा परिस्थितीत फुटबॉलसाठी प्रशिक्षित फुटबॉल व्यवस्थापक असणे आवश्यक आहे.
- हेन्री मेनेझेस, सीईओ, विफा 


पोस्ट ग्रॅज्युएशन फुटबॉल डिप्लोमामुळे फुटबॉलमधील माझे ज्ञान वाढले आहे. यामुळे स्वतंत्र विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि संघकार्य इ. अत्यावश्यक कौशल्य मी शिकलो.

- नैवद्य परमार्थ, सुवर्णपदक मिळवलेला विद्यार्थी



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा