Advertisement

आधार प्रतिष्ठान, बॉडीलाईन एफसीचा पराभव


आधार प्रतिष्ठान, बॉडीलाईन एफसीचा पराभव
SHARES

'विफा वुमन फुटबॉल लीग चॅम्पियनशीप' स्पर्धेत युनायटेड पुना एसए विरुद्ध आधार प्रतिष्ठान या दोन संघात झालेल्या उपांत्य फेरीतील सामन्यामध्ये आधार प्रतिष्ठानला पराभवाचा धक्का सहन करावा लागला.

युनाटेड पुनाच्या एेश्वर्या बलपुरेने पहिल्या हाफमध्येच गोल करत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. युनायटेड पुना संघाची दमदार बचावफळी भेदण्यात आधार प्रतिष्ठानला शेवटच्या मिनिटापर्यंत यश मिळाले नाही. अखेर 1-0 च्या फरकाने पुना संघाने ही लढत जिंकली. हा सामना कुपरेज मैदान, चर्चगेट येथे खेळवण्यात आला.दुसऱ्या सामन्यात एफसी पुणे सिटी विरुद्ध बॉडी लाईन एफसी संघात झालेल्या अटीतटीच्या लढतीत एफसी पुणे सिटी संघाने 8-7 अशा फरकाने विजय मिळवला. पुणे सिटीच्या पुजा मोरेने सुरूवातीच्या सहाव्या मिनिटाला गोल करत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.

त्यानंतर 24 व्या मिनिटाला बॉडीलाईन एफसी संघाच्या कॅरेन पैसने गोल करत सामना बोरबरीत आणला. टाय ब्रेकरपर्यंत गेलेला हा सामना पुन्हा 1-1 आणि 3-3 अशा बरोबरीत सुटला. त्यानंतर सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआऊटने पुणे सिटी संघाने जिंकला.


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा