एमडीएफएची कार्यकारिणी जाहीर


एमडीएफएची कार्यकारिणी जाहीर
SHARES

नुकत्याच झालेल्या मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या (एमडीएफ) च्या निवडणुकीत आदित्य ठाकरे आणि त्यांच्या पॅनलने दणदणीत विजय मिळवला. आता एमडीएफएच्या अध्यक्षपदी आदित्य ठाकरेंची निवड झाली असून 2021 पर्यंत ते पदभार सांभाळतील.


अशी आहे कार्यकारिणी

शिवसेना आमदार अनिल परब यांच्यावर उपाध्यक्षाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यामध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पी. व्ही. शेट्टी आणि बिमल पारीख यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. चेअरमन म्हणून डॉ. विजय पाटील यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अनिल परब यांच्यासोबत उपाध्यक्ष पदासाठी सॉटर वॅझ, सुधाकर राणे आणि सुझान चौधरी हे देखील असणार आहेत. याआधी जनरल सेक्रेटरी असलेले उदय बॅनर्जी यांची पुन्हा याच पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. सहाय्यक सचिव म्हणून अनुप दुबे, हेन्री पिकार्डो, सलीम अन्सारी आणि सी. के. शेट्टी यांची निवड करण्यात आली आहे. 


कार्यकारिणी सदस्य म्हणून कॉनरॅड परेरा, अजित सावंत, दिगंबर कांडरकर, सुरेश बंजन, गणेश मढकर, फरहान बट, डॅरील डिसोझा, विलास राणे, कृष्णा पावले, फरमीन डिसोझा, जॅकिन्टो डिसिल्वा, सलीम डिसोझा, रायन मेनेजीस, ऍंथोनी रॉड्रिगेज, नासिर हुसेन, जॉन अल्मेडा, साल्वाडोर डिसोझा यांची निवड करण्यात आली आहे.

 


हेही वाचा - 

बीकेसीत होणार फुटबॉल ग्राऊंड

भारतीय फुटबॉल संघाची कामगिरी दमदार - रोनाल्डिन्होडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय