भारतीय फुटबॉल संघाची कामगिरी दमदार - रोनाल्डिन्हो

Mumbai
भारतीय फुटबॉल संघाची कामगिरी दमदार - रोनाल्डिन्हो
भारतीय फुटबॉल संघाची कामगिरी दमदार - रोनाल्डिन्हो
भारतीय फुटबॉल संघाची कामगिरी दमदार - रोनाल्डिन्हो
See all
मुंबई  -  

फुटबॉलच्या चाहत्यांसोबतच भारतात व्यावसायिक फुटबॉल खेळाडूंची संख्याही झपाट्याने वाढतेय. मागील काही वर्षांमध्ये भारतात अनेक व्यावसायिक स्पर्धांचे आयोजन होऊ लागले आहे. 'प्रीमियर फुटसॉल लिग' ही स्पर्धाही त्यात महत्त्वाचे योगदान देत आहे. गेल्या वर्षी आयोजित केलेल्या या स्पर्धेला चाहत्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्याकडे पाहता यंदाची स्पर्धा नक्कीच यशस्वी होईल. उदोयन्मुख फुटबॉलपटूंच्या देशात येऊन खूपच आनंद झाला. चाहत्यांच्या प्रेमामुळे भारावून गेल्याचे, मत ब्राझिलचा फुटबॉलपटू रोनाल्डिन्हो याने व्यक्त केले.आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानाचा बॅलोन डी ऑर पुरस्कार पटकावणारा रोनाल्डिन्हो 'प्रीमियर फुटसॉल लिग' स्पर्धेच्या घोषणेच्या निमित्ताने मुंबईत उपस्थित होता. सन २००२ मधील फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत रोनाल्डिन्होने चमकदार कामगिरी केली होती. उत्कृष्ट सांघिक कामगिरीच्या जोरावर ब्राझिलने विश्वचषक पटकावला होता.

या स्पर्धेची घोषणा करताना रोनाल्डिन्हो म्हणाला, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय फुटबॉल संघ दमदार कामगिरी करत आहे. याच कामगिरीच्या आधारे भारतीय फुटबॉल संघाचे रँकिंग सुधारले असून येत्या काळात त्यात आणखी सुधारणा होईल, असा विश्वासही त्याने व्यक्त केला.'प्रीमियर फुटसॉल लिग'चे हे दुसरे वर्ष आहे. १५ सप्टेंबरपासून वरळीतील एनएससीआय स्टेडियममध्ये या स्पर्धेला सुरूवात होणार आहे. दिल्ली, बेंगरुळु या ठिकाणी देखील या स्पर्धेचे काही सामने खेळवण्यात येणार असून स्पर्धेतील उपांत्य आणि अंतिम सामना दुबईत खेळवला जाणार आहे.

या स्पर्धेत यंदा ६ संघ सहभागी होणार आहेत. प्रत्येक संघ एकूण 7 सामने खेळणार आहे.हे देखील वाचा - 

भारतीय फुटबॉल संघ कुणालाही घाबरत नाही - माटोस

'टूथब्रश'वर फुटबॉल फिरवून मोहनीशचा विश्वविक्रमडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.