SHARE

भारतात ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या अंडर- 17 मुलांच्या'फिफा फुटबॉल वर्ल्डकप' स्पर्धेतील सामन्यांचा 'ड्रॉ' नुकताच काढण्यात आला. या 'ड्रॉ' मध्ये यजमान भारताला अमेरिका, कोलंबिया आणि घाना या संघासोबत 'अ' गटात स्थान मिळाले आहे.

हा गट अत्यंत 'टफ' असून हे तीन्ही संघ भारतापुढे अत्यंत कठीण आव्हान उभे करतील, असे म्हटले जात आहे. परंतु प्रतिस्पर्धी संघ कुठलाही असो भारतीय संघ कुणालाही घाबरणारा नाही, असे म्हणत भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक लुईस माटोस यांनी संघाचे मनोबल उंचावण्याचा प्रयत्न केला आहे.

फुटबॉलमध्ये अशक्य असे काहीही नाही. त्यामुळे आम्ही प्रत्येक संघाविरोधात चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आमचे खेळाडू कुणालाही घाबरणारे नाहीत. प्रत्येकामध्ये सकारात्मक खेळ करण्याची क्षमता आहे. 20 टक्के चांगली सुरूवात मिळाली, तरी आम्ही ती 100 टक्क्यांपर्यंत घेऊन जाऊ, असेही माटोस म्हणाले.


असा आहे ड्रॉ -

भारतीय संघाचा सलामीचा सामना 6 ऑक्टोबरला अमेरिकेसोबत होणार असून 9 ऑक्टोबरला दुसरी लढत कोलंबियासोबत होणार आहे. तर भारतीय संघाची अखेरची झुंज 12 ऑक्टोबरला घानासोबत होणार आहे.

हा वर्ल्डकप 6 ते 28 ऑक्टोबरदरम्यान चालणार असून भारताच्या तिन्ही लढती दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर होणार आहेत.हे देखील वाचा -

'टूथब्रश'वर फुटबॉल फिरवून मोहनीशचा विश्वविक्रमडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)  

संबंधित विषय
ताज्या बातम्या