'फिफा विश्वचषक' स्पर्धेने मिळेल भारतीय फुटबॉलला प्रोत्साहन

 Mumbai
'फिफा विश्वचषक' स्पर्धेने मिळेल भारतीय फुटबॉलला प्रोत्साहन
Mumbai  -  

भारतात पहिल्यांदाच 'फिफा अंडर- 17 विश्वचषक' फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेचा थरार 6 ऑक्टोबरपासून भारतीयांना प्रत्यक्ष स्टेडियमवर जाऊन अनुभवता येणार आहे. भारतीय संघ या स्पर्धेचा आयोजक असल्याने भारतीय संघाला विश्वचषकाच्या साखळी सामन्यांमध्ये आपसूकच प्रवेश मिळालेला आहे. त्यामुळे चाहत्यांकडून भारतीय फुटबॉल संघाला उत्स्फूर्त पाठिंबा मिळेल.

भारताने या विश्वचषक स्पर्धेचे यशस्वी आयोजन केल्यास देशातील फुटबॉल स्पर्धांना नवे प्रोत्साहन मिळेल, अशी आशा 'एआयएफएफ' (अखिल भारतीय फुटबॉल महासंघ) ने व्यक्त केली आहे.

भारतात होणाऱ्या या विश्वचषक स्पर्धेत इंग्लंड, जर्मनी, स्पेन, ब्राझील, कोलंबिया, जापान इ.
महत्त्वाचे संघ खेळणार आहेत. मुंबई, नवी दिल्ली, कोलकाता, गोवा, गुवाहाटी आणि कोची या शहरांसोबतच नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर देखील या स्पर्धेतील सामने होणार आहेत. 16 मे पासून या स्पर्धेच्या तिकीट विक्रीला सुरूवात होणार आहे.

तिकीटांच्या माहितीसाठी या लिंकवर क्लिक करा -

http://www.fifa.com/u17worldcup/organisation/ticketing/index.html

Loading Comments