Advertisement

मुंबई एफसी ब विरुद्ध एअर इंडिया सामना बरोबरीत


मुंबई एफसी ब विरुद्ध एअर इंडिया सामना बरोबरीत
SHARES

अंधेरी स्पोर्ट्स काॅम्प्लेक्समध्ये झालेल्या 'एमडीएफए लीग' फुटबॉल स्पर्धेत मुंबई एफसी ब विरुध्द एअर इंडिया अंडर-19 संघात अतिशय अटीतटीची झुंज पाहायला मिळाली. दोन्ही संघांनी एकमेकांना कडवी लढत दिल्याने अखेर हा सामना 1-1 असा बरोबरीत संपला. अतिरिक्त कालावधीत देखील एअर इंडियाने कट्टर प्रतिस्पर्धी मुंबई एफसी ब संघाला चांगली लढत दिल्याने मुंबईला अखेरच्या सामन्यात परत येता आले नाही.

मुंबई एफसी संघाचा खेळाडू राकेश करमरण याने 13 व्या मिनिटाला पहिला गोल नोंदवत संघाला आघाडी मिळवून दिली. मुंबई एफसीची आघाडी पाहून असे वाटत होते की, त्यांचा सहज विजय होईल. पण पुढील सातच मिनिटांनी एअर इंडियाच्या आशिष लालगे याने गोल नोंदवत सामना बरोबरीत आणला. त्यानंतरही एअर इंडियाच्या खेळाडूंनी मुंबई एफसी ब संघाला वरचढ होऊ दिले नाही.

यानंतर कूपरेज मैदानावर खेळविण्यात आलेल्या दुसऱ्या सामन्यात मुंबई स्ट्राईकरने बॅंक ऑफ इंडियावर 2-1 अशा फरकाने विजय मिळवला. मुंबई स्ट्राइकरच्या अरनॉल्ड मॅस्करेन्हस याने 49 व्या मिनिटाला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. तर अरसलन हमदुले याने 82 व्या मिनिटाला दुसरा नोंदवला. बँक ऑफ इंडियाच्या गौरव मोरे याने 60 व्या मिनिटाला संघाकडून एकमेव गोल नोंदवला.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा