फुटबॉल लीगमध्ये वांद्रे पॅकर्सची कार्मेलाईट्स एससीवर मात


  • फुटबॉल लीगमध्ये वांद्रे पॅकर्सची कार्मेलाईट्स एससीवर मात
SHARE

16 व्या वांद्रे वेस्ट फुटबॉल लीग या स्पर्धेत पुरुषांच्या प्रिमियर डिव्हिजन उप-उपांत्य फेरीत वांद्रे पॅकर्स संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्धी कार्मेलाईट्स एससी संघाला 2-1 अशा फरकाने मात दिली. ही स्पर्धा वांद्रे पूर्व येथील सुपारी तलावाजवळील पालिकेच्या मैदानावर खेळवण्यात आली.

वांद्रे पॅकर्स संघाच्या रेलीन डी मेल्लो आणि रानझी कालीचरण या दोघांनी गोल करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. कार्मेलाइट्स संघाच्या डेंझिल मास्कारेनहास याने एक गोल केला.

याचवेळी झालेल्या इतर सामन्यांत सेम डिव्हिजनमध्ये सेलटिक एफसी संघाने 3-1 अशा फरकाने एमडब्ल्यू स्ट्रायकर्स संघाला नमवत सामना जिंकला. या रोमांचक अशा सामन्यात सेलटिक संघातल्या करण कपूरच्या दोन गोलांमुळे संघ आघाडीवर आला. त्यानंतर अझीम खानच्या गोलामुळे अखेर सेलटिक संघाला विजय मिळवता आला. एमडब्ल्यू संघाच्या फक्त अश्विन मंद्रे याने एक गोल केला.

या दरम्यान झालेल्या पुरुषांच्या प्रथम डिव्हिजनमध्ये माउंटमेरी संघाने मोठ्या फरकाने क्लिफोर्ड कारमेन फाउंडेशन संघाला 8-0 अशी मात देत विजय साकारला. या सामन्यात माउंटमेरी संघाच्या शानदार खेळापुढे प्रतिस्पर्धी असलेल्या क्लिफोर्ड संघाला आपले वर्चस्व टिकवता आले नाही. माउंटमेरीच्या योगेश कदम याने दोन गोल केले, तर जगदीश कुरवार, अक्षय सतपोजी, रियान डिसोझा, राहुल सलियान, रोहेल शेख, जॉन्सन वरघेसे यांनी प्रत्येकी एक गोल केला. पण क्लिफोर्ड कारमेन संघाला एकही गोल करण्यात यश मिळाले नाही.हेही वाचा - 

फुटबॉल प्रिमियर लीगमध्ये अंतिम सामन्यात फ्लीट फूटर्सचा विजय


संबंधित विषय
ताज्या बातम्या