SHARE

दुसऱ्या बोरिवली प्रीमियर फुटबॉल लीगच्या अंतिम सामन्यात फ्लीट फूटर्स संघाने टाय ब्रेकरमध्ये 5-3 अशा फरकाने मिलन क्लबचा पराभव करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. ही स्पर्धा बोरिवलीच्या सेंट फ्रान्सिस डीअसिस मैदानावर रंगली होती.
विजयी संघ ठरलेल्या फ्लीट फूटर्सला चषक, 30 हजार रुपये आणि सुपर्ण पदक देऊन गौरवण्यात आले. तर उपविजेत्या मिलन संघाला रौप्य पदक आणि 20 हजार रुपये देऊन गौरवण्यात आले.

फ्लीट फूटर्समधील सनी ठाकूरने सुरुवातीला आक्रमक असा गोल करत मिलन संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर केन परेराने दुसरा गोल करत बरोबरी केली. टायब्रेकरमध्ये फ्लीट फूटर्स संघाने यशस्वीपणे केन परेरा, उमेश परेरा, फ्रान्को डीसोझा आणि ग्रेनव्हिल मुरझेल्लो यांनी गोल करत उत्कृष्ट कामगिरी केली. मिलन क्लबच्या सनी ठाकूर, रोनक पटेल आणि सिद्धार्थने दोन गोल केले. पण याच वेळी गोल करण्याच्या प्रयत्नात असलेले नचिकेत पालव आणि आशिष चव्हाण अयशस्वी ठरले आणि मिलन क्लब संघाला पराभव पत्करावा लागला.

या अंतिम सामन्यात मिलन क्लबचा सनी ठाकूर प्लेयर ऑफ द टुर्नामेंट ठरला. फ्लीट फूटर्सचा केन परेरा हा गोल्डन बूट (हाय स्कोरर) ठरला. बेस्ट डिफेन्डर म्हणून मिलन क्लबचा नचिकेत पालव आणि उत्कृष्ट गोलकीपर म्हणून मेरीलॅंड युनायटेडच्या कार्तिक पुथरनची निवड करण्यात आली.

यामध्ये तिसरा क्रमांक मेरीलॅंड युनायटेड संघाने पटकावला. त्यांनी टायगर स्पोर्टस् संघाचा 3-1 अशा फरकाने पराभव करत विजय मिळवला. यावेळी चषक आणि 10 हजार देऊन संघाचा सत्कार करण्यात आला.हेही वाचा - 

भारतीय फुटबॉल संघ कुणालाही घाबरत नाही - माटोस

'टूथब्रश'वर फुटबॉल फिरवून मोहनीशचा विश्वविक्रम


संबंधित विषय
ताज्या बातम्या

YouTube व्हिडिओ