रमेश, तुषारच्या दुहेरी हल्ल्यामुळे फ्लीट फुटर्सचा विजय


रमेश, तुषारच्या दुहेरी हल्ल्यामुळे फ्लीट फुटर्सचा विजय
SHARES

दुसऱ्या बोरिवली प्रिमियर फुटबॉल लीगमध्ये फ्लीट फुटर्स संघाच्या स्ट्रायकर्स रमेश सिंग आणि तुषार पुजारी यांनी उत्कृष्ट अशी कामगिरी करत प्रत्येकी दोन गोल केले. ही स्पर्धा गुरुवारी बोरिवली येथील सेंट फ्रान्सिस डीअसीसी ग्राऊंडवर रंगली होती.

या सामन्यात प्रतिस्पर्धी असलेल्या फायर ड्रॅगन्स संघाला 6-2 अशा फरकाने पराभव करत फ्लीट फुटर्सने विजय मिळवला. फ्लीट फुटर्सच्या दिग्विजय यादव आणि कुणाल म्हेत्रे यांनी प्रत्येकी एक गोल केला तर, फायर ड्रॅगन्सच्या डेनी जॉन आणि अमेय भटकळ यांनी प्रत्येकी एक गोल केला. फ्लीट फुटर्स संघाच्या खेळाडूंनी बॉल ताब्यात घेण्याचा अधिक आंनद घेत चांगल्या संधी निर्माण करत सहा गोल केले. फ्लीट फुटर्स संघातील विजय याने गोलरक्षक म्हणून उत्तम कामगिरी बजावली. उत्कृष्ट खेळाडू म्हणून विजय याला पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

तत्पूर्वी झालेल्या फेरीत टायगर एसएफने चॅलेंजर एफसीवर 3-1 असा विजय मिळवला. अनुभवी असलेल्या हेकटम सिंह, शुभम माने आणि प्रख्यात शेट्टी यांनी टायगर संघासाठी प्रत्येकी एक गोल केला तर, चॅलेंजर एफसीच्या उत्सव बछानी याने एक गोल केला. या सामन्यात उत्कृष्ट खेळाडू म्हणून टायगर एसएफ संघाचा हेकमट सिंह याला गौरवण्यात आले.

संबंधित विषय