Advertisement

संतोष ट्राॅफीसाठी महाराष्ट्र संघात १२ मुंबईकर खेळाडूंचा समावेश


संतोष ट्राॅफीसाठी महाराष्ट्र संघात १२ मुंबईकर खेळाडूंचा समावेश
SHARES

अखिल भारतीय फुटबाॅल महासंघाच्या (एअायएफएफ) मान्यतेने होणाऱ्या ७२व्या राष्ट्रीय फुटबाॅल अजिंक्यपद स्पर्धेसाठी म्हणजेच संतोष ट्राॅफीसाठी महाराष्ट्राचा संघ अाज जाहीर करण्यात अाला. या संघात मुंबईच्या एक-दोन नव्हे तर तब्बल १२ फुटबाॅलपटूंनी स्थान मिळवले अाहे. महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व नागपूरचा अनुभवी गोलकीपर अोवेस खान याच्याकडे सोपविण्यात अाले अाहे. संतोष ट्राॅफी स्पर्धेला अहमदाबाद, गुजरात येथे ९ जानेवारीपासून सुरुवात होणार अाहे. ४० संभाव्य खेळाडूंमधून २० जणांच्या महाराष्ट्र संघाची निवड करण्यात अाली. मुख्य प्रशिक्षक अाॅगस्टो डीसिल्वा यांच्यासह सहप्रशिक्षक मॅथ्यू सुसैनाथन तसेच व्यवस्थापक सुधाकर राणे अाणि फिजियो कुणाल बारगल यांच्या नेतृत्वाखाली हा संघ निवडण्यात अाला.


महाराष्ट्राची सलामी दमणशी

महाराष्ट्राला ९ जानेवारी रोजी रंगणाऱ्या पहिल्याच सामन्यात दमण अाणि दीव संघाचा सामना करावा लागेल. त्यानंतर पात्रता फेरीच्या लढतीत महाराष्ट्राचे सामने लक्षद्वीप (११ जानेवारी) अाणि मध्य प्रदेश (१३ जानेवारी) यांच्याशी होतील. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ अंतिम फेरीत खेळतील.


महाराष्ट्राचा संघ

गोलरक्षक - अोवेस खान (कर्णधार, नागपूर), हर्षद मेहेर (मुंबई)
बचावपटू - डिअाॅन मेनेझेस शुभम खानविलकर, निखिल प्रभू, सॅमसन जोसेफ (सर्व मुंबई), अफझल अख्तर (नागपूर)
मधली फळी - अश्रफली माकनदार, हिमांशू पाटील, लिनेकर मच्याडो, मर्विन स्टीफन, अद्वैत शिंदे (सर्व मुंबई), किरण पंढरे (सोलापूर), मोहम्मद एन. अार, वासू कनोजिया (नागपूर), असिफुल्ला खान (यवतमाळ), साहिल भोकरे (पुणे)
अाघाडीची फळी - अनिकेत जोशी (नागपूर), रणजीत सिंग व अारोन डिकोस्टा (मुंबई).

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा