जीत फाऊंडेशनची अंडरडॉग्जवर ३-२ ने 'जीत'


जीत फाऊंडेशनची अंडरडॉग्जवर ३-२ ने 'जीत'
SHARES

चर्चगेट येथील कुपरेज मैदानावर रंगलेल्या अंतिम सामन्यात जीत फाऊंडेशनने अंडरडॉग्ज संघावर ३-२ ने मात करत साेळा वर्षांखालील दुसऱ्या 'गोल्डन टच फुटबॉल टुर्नामेंट'वर नाव कोरले.

जीत फाऊंडेशन आणि अंडरडॉग्जमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला. जीत फाऊंडेशनच्या सुनील राठोड याने सुरुवातीला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यापाठोपाठ जीत फाऊंडेशनने आणखी एक गोल करत अंडरडॉग्जच्या आक्रमणातील हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु अंडरडॉग्जने हिंमत न हारता दोन गोल झळकावून सामना बरोबरीला आणून ठेवत टायब्रेकरपर्यंत नेला.

अखेर टायब्रेकरनंतरच्या अतिरिक्त वेळेत जीत फाऊंडेशनने ही स्पर्धा ३-२ च्या फरकाने जिंकली. जीत संघाकडून सुनील राठोड, शंतनू प्रजापती, कुमार राठोड यांनी गोल केले. तर अंडरडॉग्ज संघाकडून कार्तिक चौहान आणि निखील सक्रिय यांनी गोल नोंदवले.डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)
 

संबंधित विषय