Advertisement

एमडीएफए फुटबॉल लीगमध्ये कर्नाटक एसएचा विजय


एमडीएफए फुटबॉल लीगमध्ये कर्नाटक एसएचा विजय
SHARES

एमडीएफए फुटबॉल लीगमधील एलिट डिव्हिजनमध्ये कर्नाटक स्पोर्टिंग असोसिएशनने प्रतिस्पर्धी असलेल्या केंकरे एफसी संघाला ३-२ ने मात देत विजय सकारला. ही स्पर्धा कुपरेज मैदानावर खेळवण्यात आली. यावेळी परळच्या झेवियर्स मैदानावर खेळवण्यात आलेल्या थर्ड डिव्हिजनमध्ये अल्फा फुटबॉल अकादमीने प्रतिस्पर्धी संघ एफसी कॉसमॉस संघाचा १-० ने पराभव केला.


कर्नाटक स्पोर्टिंगचा विजय

हा खेळ सुरुवातीला संथ गतीने सुरू होता. पण अचानक कर्नाटक स्पोर्टिंग असोसिएशनच्या सोहेल खत्रीने २८ व्या मिनिटाला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर लगेचच चार मिनिटांनी केंकरेच्या गिरीश कामतने गोल करत ही आघाडी मोडीत काढत बरोबरी साधली. पुन्हा २ मिनिटांनी केंकरेच्या यश म्हात्रेने गोल करत कर्नाटक स्पोर्टिंगला दबावाखाली आणत २-१ ने आघाडी घेतली. ही आघाडी मोडीत काढण्यासाठी कर्नाटक स्पोर्टिंग असोसिएशनच्या खेळाडूंनी आक्रमक असा खेळ करत शेवटच्या वेळेत ६४ व्या मिनिटाला तुषार पुजारी आणि त्यानंतर लगेचच ६५ व्या मिनिटाला रॉजर सेम याने गोल करत संघाला विजय मिळवून देत शानदार कामगिरी केली.

याचदरम्यान अल्फा फुटबॉल अकॅडेमी विरुद्ध एफसी कॉसमॉसमधील लढत देखील रोमाचंक ठरली. यामध्ये दोन्ही संघांकडून गोल करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. पहिल्या सत्राच्या शेवटी अल्फाच्या गिरीश बिष्ट याने ३५ व्या मिनिटाला गोल करत संघाला विजय मिळवून दिला.


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा