मुंबईकर रियाची महाराष्ट्राच्या फुटबाॅल संघाच्या कर्णधारपदी निवड


SHARE

मुंबई शहरच्या रिया टंक हिची महाराष्ट्र फुटबाॅल संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात अाली अाहे. गोवा येथे २० ते ३१ अाॅगस्टदरम्यान रंगणाऱ्या एअायएफएफ राष्ट्रीय ज्युनियर फुटबाॅल स्पर्धेसाठी रियाच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राचा संघ सहभागी होणार अाहे. मुंबईच्याच अतिरिया नारायण हिच्याकडे उपकर्णधारपदाची सूत्रे सोपविण्यात अाली अाहेत. दुर्वा वाहिया यांच्याकडे प्रशिक्षकपदाची जबाबदारी असेल तर प्रिया परेरा ही संघाची मॅनेजर असेल.


महाराष्ट्राचा संघ

एेश्वर्या उबरहांडे, दिपशिखा हिवळे (बुलढाणा), रामायाश्री शांतीप्रसाद, कोल्हापूर, रिया टंक (कर्णधार), अाकांक्षा कांडळकर, अनघा जानकीरामन, अर्क डीसिल्वा, अतिरिया नारायण, डेनिस परेरा, फ्लोरियन परेरा, करेन पैस, नेहा समरे, रिहा राॅड्रिग्स, रेवा संखे, रितिको गोवस, शेमचुई निंगशेंग, ट्रिसिया कोलॅसो, वॅलेंसिया डीमेलो (सर्व मुंबई), अॅनी अँथनी (नागपूर), एेश्वर्या जगताप (पुणे). प्रशिक्षक – दुर्वा वाहिया, मॅनेजर – प्रिया परेरा.


हेही वाचा -

अागरकरला दिलासा, हकालपट्टीची याचिका एमसीएने फेटाळली

मुंबईकर अभिषेक नायर पुद्दुचेरीकडून खेळणारसंबंधित विषय
ताज्या बातम्या