Advertisement

मुंबईकर अभिषेक नायर पुद्दुचेरीकडून खेळणार


मुंबईकर अभिषेक नायर पुद्दुचेरीकडून खेळणार
SHARES

मुंबईचा एकेकाळचा अाधारस्तंभ अाणि माजी कर्णधार अभिषेक नायर मुंबईला सोडचिठ्ठी देऊन अाता २०१८-१९ मोसमात पुद्दुचेरी या संघाचे प्रतिनिधित्व करणार अाहे. २००५ मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या ३४ वर्षीय अभिषेक नायरने ९९ सामन्यांत मुंबईचे प्रतिनिधित्व केले अाहे. मधल्या फळीतील फलंदाज अाणि मध्यमगती फलंदाज अशा अष्टपैलू भूमिका पार पाडणाऱ्या अभिषेकने ५६२७ धावा अापल्या नावावर केल्या असून त्याने १६४ विकेट्सही मिळवल्या अाहेत. याबरोबरच तो भारताकडून तीन वनडे सामनेही खेळला अाहे.



पुद्दुचेरीचा नव्याने समावेश

रणजी क्रिकेटमध्ये या वर्षी ३७ संघांना स्थान देण्यात अाले अाहे. या वर्षी समाविष्ट करण्यात अालेल्या ९ नव्या संघांमध्ये पुद्दुचेरीचा समावेश अाहे. या अाव्हानांबद्दल नायर म्हणतो, हा ब्रँड न्यू संघ अाहे. त्यांच्याकडे खेळाडूही नाहीत. मात्र नवी अाव्हाने स्वीकारायला मला नेहमीच अावडते. मी जिकडे जातो, तिकडे माझा प्रभाव दाखवत असतो. पुद्दुचेरी संघातून खेळणाऱ्या युवा खेळाडूंना माझ्या अनुभवाचा फायदा करून देण्यासाठी मी उत्सुक अाहे.


सध्या सल्लागाराच्या भूमिकेत

गेल्या दोन वर्षांपासून अभिषेक नायर हा सल्लागाराच्या भूमिकेत स्थिरावताना दिसत अाहे. दिनेश कार्तिकला त्याने केलेल्या मार्गदर्शनामुळे कार्तिकने अापल्या करिअरमध्ये यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून मोठी झेप घेतली अाहे. त्याचबरोबर नायरची २०१८ मोसमासाठी कोलकाता नाइट रायडर्सचा सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात अाली होती.


कर्णधारपद स्वीकारणार नाही

नव्या संघाचे कर्णधारपद भूषविण्यास मात्र अभिषेक नायरने नकार दिला अाहे. नव्या संघाकडून मी काही तीन-चार वर्षे खेळणार नाही. त्यामुळे कर्णधारपदाची सूत्रे हाती घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पुढील ८-१० वर्षे एखादा संघाचे नेतृत्व सांभाळण्यासाठी तयार असेल तर त्याला घडविण्यासाठी अाणि मदत करण्यासाठी मी तयार अाहे. एक वर्ष कर्णधारपद स्वीकारलं तर संघाच्या दीर्घकालीन योजनेवर परिणाम होईल. त्यामुळे अन्य खेळाडूकडेच नेतृत्व स्वीकारलेले बरे.


रोहित शर्मानेही दिल्या शुभेच्छा

अभिषेक नायरला पुढील वाटचालीसाठी त्याचा सहकारी अाणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मानेही शुभेच्छा दिल्या अाहेत. मुंबईचा दिग्गज खेळाडू मुंबई क्रिकेटला अलविदा करत अाहे. त्याला बऱ्याच वर्षांपासून मी अोळखत असून स्वार्थपणा नसलेला अाणि मला भेटलेला तो एकमेव खेळाडू अाहे. पुढील वाटचालीत अनेक विस्मयकारक गोष्टी घडणार अाहेत, त्यासाठी तुला शुभेच्छा, अशा शब्दांत रोहित शर्माने त्याचे कौतुक केले अाहे.


हेही वाचा -

अभिषेक नायर बनला केकेअार अकादमीचा मुख्य प्रशिक्षक

कसोटीतही अोपनिंगला येण्यास रोहित शर्मा सज्ज



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा