Advertisement

कसोटीतही अोपनिंगला येण्यास रोहित शर्मा सज्ज


कसोटीतही अोपनिंगला येण्यास रोहित शर्मा सज्ज
SHARES

भारताचा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील सलामीवीर रोहित शर्माला अाता कसोटीतही अोपनिंगला येण्याचे वेध लागले अाहेत. जर संघव्यवस्थापनाने माझ्या पर्यायाचा विचार केला तर डावाची सुरुवात करण्यासाठी मी सज्ज अाहे, असे रोहित शर्माने सांगितले. रोहित शर्माने २५ कसोटी सामन्यांत ४० च्या सरासरीने १४७९ धावा फटकावल्या असून त्यात तीन शतके अाणि ९ अर्धशतकांचा समावेश अाहे.


मला कधीही अाॅफर दिली नाही

कसोटीत डावाची सुरुवात करण्याची अाॅफर मला संघव्यवस्थापनानं कधीही दिली नाही. पण संघ व्यवस्थापनाला गरज असल्यास, काहीही करायची माझी तयारी अाहे. मी खेळायला सुरुवात केली तेव्हा वनडेत अोपनर म्हणून मी सुरुवात करेन, अशी कल्पनाही केली नव्हती. पण प्रवासादरम्यान ते शक्य झाले. मी सर्व पर्याय खुले ठेवले असून संधी मिळाल्यास, कसोटीतही डावाची सुरुवात करेन, असे रोहित शर्मा म्हणाला.


कसोटी पुनरागमनाची अाशा

रोहित शर्माला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या तीन कसोटी सामन्यांसाठीच्या १८ सदस्यीय भारतीय संघात स्थान मिळाले नाही. मात्र अद्यापही कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची अाशा त्याला अाहे. कसोटी संघाचा एक भाग असावे, असे मला वाटते, पण ते माझ्या हातात नाही. मला योग्य त्या संधीची वाट पाहावी लागेल. मात्र त्या संधीसाठी मी सज्ज असून खडतर प्रशिक्षण घेत अाहे. एकदा संधी मिळाली की, त्या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न मी करेन, असेही रोहित शर्मा म्हणाला.


भारतीय संघाला पाठिंबा

मुंबई इंडियन्सचा कर्णधार असलेल्या रोहित शर्माने सध्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत ०-२ ने पिछाडीवर असलेल्या भारतीय संघाला पाठिंबा दिला अाहे. त्याने सांगितले की, भारतीय संघावर विश्वास ठेवायला हवा. अजूनही भारतीय संघ मुसंडी मारू शकतो. तसे अाम्ही दक्षिण अाफ्रिकेत करून दाखवले होते. अाफ्रिकेतील पहिल्या दोन कसोटीत पराभव पत्करावा लागल्यानंतर जोहान्सबर्ग कसोटीत जोमाने पुनरागमन करून अाम्ही तो सामना जिंकला होता. भारतीय संघ काहीही करू शकतो. सध्या भारतीय संघ कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी अाहे, हे विसरता कामा नये.


हेही वाचा -

रोहित शर्माची लंडनवारी धोक्यात, रहाणेच्या अाशा पल्लवित

रोहित शर्मा यो-यो टेस्टमध्ये 'पास'!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा