याला जबाबदार कोण?

मालाड - येथील प्रसिद्ध असा शांताराम तलाव सध्या दुर्गंधीच्या विखळ्यात अडकलाय. याच कारण आहे या तलावात मृत पावलेले हे मासे. पालिकेने या तलावात मासे सोडले खरे मात्र त्याची निगा पालिकेला राखता आली नाही आणि याचा त्रास भोगतायेत इथले रहिवासी. एक दोन नाही तर शेकडो मासे या तलावात मृत पावलेत आणि त्याची दुर्गंधी सगळीकडे पसरलीय.

तलावात मासे मृत पावल्याचा हा प्रकार पहिल्यांदाच घडला असे नाही. याआधीही असा प्रकार घडला होता. करोडो रुपये खर्च करून मुंबईत तलावाचं सुशोभिकरण केेलं जातं. मात्र त्याची निगा कशी राखली जाते याचं हे ढळढळीत वास्तव म्हणालाय हरकत नाही.

Loading Comments 

Related News from फुटबॉल