Advertisement

कलिना-रायगडने जिंकला सुप्रिमो चषक


कलिना-रायगडने जिंकला सुप्रिमो चषक
SHARES

रायगडच्या कलिना संघाने ठाणेच्या विजयदुर्गवर ३-० असा दिमाखदार विजय मिळवत मुंबई जिल्हा फुटबाॅल संघटनेतर्फे अाणि अामदार संजय पोतनीस यांच्या विद्यमाने अायोजित सुप्रिमो चषक विभागीय फुटबाॅल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. मध्यंतराला एका गोलने पिछाडीवर असलेल्या कलिना संघाने उत्तरार्धात विजयदुर्ग संघाची अाक्रमणे थोपवून धरत अखेरच्या १० मिनिटांत दोन गोल करत विजेतेपद निश्चित केले. विजेत्या संघाला दोन लाख तर उपविजयी संघाला दीड लाख रुपयांचा पुरस्कार देऊन गौरवण्यात अाले. बोरीवलीच्या विशालगडचा पराभव करत नवी मुंबईच्या पन्हाळगडने तृतीय क्रमांकासह ७० हजारांचे पारितोषिक पटकावले.



 
२२व्या मिनिटाला खाते खोलले

कलिनाने २२व्या मिनिटाला उजवा अाघाडीवर मथायर कुटिन्होच्या गोलाच्या बळावर खाते खोलले. त्यानंतर काही काळ कलिना संघाचे खेळावर वर्चस्व राहिले. त्यानंतरही मथायसने गोल करण्याचा सुरेख प्रयत्न केला. पण थोड्या फरकाने त्याचा हा प्रयत्न हुकला. विजयदुर्ग संघाने बरोबरीचे जोरदार प्रयत्न केले पण कलिनाचा गोलरक्षक विक्रम सिंगने जबरदस्त बचाव केला.

कलिनाचे प्रतिहल्ले

कलिनाने उत्तरार्धातही प्रतिस्पर्धी संघावर प्रतिहल्ले चढवले. कामरान सिद्दीकीने एक-दोन नव्हे तर तीन बचावपटूंना भेदून गोल करण्यासाठी अागेकूच केली, मात्र विजयदुर्गच्या गोलरक्षकाला चकवणे त्याला जमले नाही. अखेर अश्फाकच्या फ्री-किकवर त्याने संधी साधली. ६०व्या मिनिटाला केलेला गोल महत्त्वाचा ठरला. त्यानंतर कामरानने अाणखी एक गोल करत संघासाठी तिसरा गोल करून कलिनाच्या विजयावर मोहोर उमटवली.


हे ठरले पुरस्कार विजेते -

स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू - फारूक चौधरी (ठाणे)
सर्वोत्तम बचावपटू - प्रमोद मांडे (कलिना)
सर्वोत्तम स्ट्रायकर - कामरान सिद्दीकी (कलिना)
अंतिम सामन्यातील सर्वोत्तम - कामरान सिद्दीकी (कलिना)
सर्वोत्तम मिडफिल्डर - विजित शेट्टे (नवी मुंबई)
सर्वोत्तम गोलरक्षक - विक्रम सिंग (कलिना)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा