आदित्य ठाकरेंच्या हस्ते सुप्रिमो चषकाचं उद्घाटन

सुप्रिमो चषकाच्या थराराची सुरुवात बुधवारी युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाली. भारतातील मोठी टेनिस बॉल  क्रिकेट टुर्नामेंट समजल्या जाणाऱ्या या सामन्यात पहिली खेळी ट्रायडेंट उमर XI नवी मुंबई विरुद्ध दहिसर बॉईज या दोन संघांमध्ये रंगली. दरवर्षी ही स्पर्धा कलिना इथल्या एयर इंडीया ग्राउंड येथे खेळवली जाते. उद्घाटनाला ग्राउंडवर हजारोंच्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते. या वेळी आयोजक आमदार अनिल परब, संजय पोतनीस तसेच खासदार गजानन किर्तिकर उपस्थित होते.

सुप्रिमो चषकात एकूण 16 संघ सहभागी झाले आहेत. महाराष्ट्र तसेच भारतातल्या विविध राज्यातल्या संघानी सहभाग यात  घेतला आहे. बुधवारपासून सुरू झालेली ही स्पर्धा सलग 5 दिवस चालणार आहे. या स्पर्धेत तब्बल 10 लाखांचे बक्षिस आहे. सोबतच जो सामनावीर ठरेल त्याला अल्टो कार बक्षिस म्हणून दिली जाणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त 2010 साली सुप्रिमो या चषकाचं आयोजन करण्यात आलं होतं.

Loading Comments