Advertisement

फुटबॉल टुर्नामेंटमध्ये कॅनरा संघ ३-१ ने विजयी

मोगवीरा विरुद्ध कॅनरामध्ये झालेली लढत चुरशीची ठरली. ए. आर. कुडरोली मेमोरियल नॉकआउट फुटबॉल टुर्नामेंटमधील अतिंम सामन्यात कॅनरा संघाने ३-१ ने विजय मिळवला.

फुटबॉल टुर्नामेंटमध्ये कॅनरा संघ ३-१ ने विजयी
SHARES

ए. आर. कुडरोली मेमोरियल नॉकआउट फुटबॉल टुर्नामेंटमधील अतिंम सामन्यात कॅनरा एससी संघाने प्रतिस्पर्धी असलेल्या मोगवीरा एससी संघाचा ३-१ ने पराभव करत विजय मिळवला. कर्नाटक स्पोर्टिंग असोसिएशनने आयोजित केलेली ही स्पर्धा मरिन लाइन्स येथील क्रॉस मैदान येथे रंगली.


अटीतटीची लढत

मोगवीरा विरुद्ध कॅनरामध्ये झालेली लढत चुरशीची ठरली. मोगवीराच्या दर्श करकेरा याने खेळाच्या सातव्या मिनिटाला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. नंतर कॅनरा एससीच्या खेळाडूंनी देखील शानदार खेळ करत मोगवीरावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मोगवीराने २३ व्या मिनिटाला कॅनराच्या नेहाल शेट्टीने गोल करत बरोबरी साधली. यामुळे दोन्ही संघांमध्ये अटीतटीची अशी लढत झाली. सहाव्या मिनिटाला कॅनराच्या अशटॉन डायस याने गोल करत २-१ अशी आघाडी मिळवली. या आघाडीमुळे मोगवीरासंघ मानसिक तणावाखाली आला.


दुसऱ्या सत्रात मोगवीराची आक्रमक खेळी

दुसऱ्या सत्रात मोगवीराने आक्रमक खेळी करत कॅनेराची आघाडी मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. पण कॅनराच्या डिफेन्स समोर त्यांना यश मिळवणे कठीण झाले. पण सामन्याच्या ३६ मिनिटाला कॅनराच्या शेल्डोन रेगो याने गोल करत संघाला विजय करण्यात महत्त्वाची भूमिका बजवाली.

यावेळी विजेत्या संघाचा सत्कार भारताचा माजी स्ट्रायकर स्टिव्हन डायस यांच्या हस्ते करण्यात आला. तर उत्कृष्ट गोल रक्षक, बेस्ट डिफेन्डर, बेस्ट मिडलफिल्डर आणि बेस्ट स्ट्रायकर म्हणून अनुक्रमे प्रथमेश होनावरकर, केवीन डिसिल्व्हा, ग्लेन मोरेज आणि नेहाल शेट्टी यांना पुरस्कार देण्यात आला.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा