Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
51,38,973
Recovered:
44,69,425
Deaths:
76,398
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
45,534
1,794
Maharashtra
5,90,818
37,236

धवल वाघेलाच्या हॅटट्रिकमुळे साॅकर स्टार्झचा दणदणीत विजय


धवल वाघेलाच्या हॅटट्रिकमुळे साॅकर स्टार्झचा दणदणीत विजय
SHARES

स्ट्रायकर धवल वाघेलाने झळकावलेल्या शानदार हॅटट्रिकच्या जोरावर एनडी२ साॅकर स्टार्झ संघाने बोरीवली फुटबाॅल लीगमध्ये (बीपीएफएल) ब गटात दणदणीत विजयाची नोंद केली. धवलची हॅटट्रिक अाणि प्रतीक शिंदेने त्याला दिलेली साथ यामुळे साॅकर स्टार्झ संघाने काजूपाडा फुटबाॅल क्लबचा ४-० असा सहज धुव्वा उडवला. बोरीवली स्पोर्टस फाऊंडेशन अाणि एमडीएफएच्या मान्यतेने सुरू असलेल्या या स्पर्धेत साॅकर स्टार्झने अाक्रमक सुरुवात करत सामन्यावर सुरुवातीपासूनच वर्चस्व प्रस्थापित केलं.


पहिल्या सत्रात संधी गमावल्या

अाक्रमक खेळामुळे साॅकर स्टार्झ संघाने पहिल्या सत्रात गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण केल्या होत्या, मात्र या संधीचे त्यांना सोने करता अाले नाही. मात्र २८व्या मिनिटाला वाघेलाने संघाचे खाते खोलल्यानंतर चार मिनिटांनी पुन्हा एकदा गोल करत त्याने साॅकर स्टार्झला २-० अशी अाघाडी मिळवून दिली.


अतिरिक्त वेळेत हॅटट्रिक

त्यानंतर प्रतीक शेट्टीने तिसरा गोल करत साॅकर स्टार्झ संघाचा विजय निश्चित केला होता. मात्र धवल वाघेलाने अतिरिक्त वेळेतील तिसऱ्या मिनिटाला चौथा गोल करून अापली हॅटट्रिक साजरी केली अाणि साॅकर स्टार्झ संघाला ब गटात एका दणदणीत विजयाची नोंद करून दिली. या शानदार कामगिरीबद्दल वाघेलाला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात अाले.


हेही वाचा -

मुंबई सिटी एफसी संघात बिपीन सिंगचा समावेश

शिव्या घाला, टीका करा, या सुनील छेत्रीच्या भावनिक अावाहनानंतर मुंबईतील सामना हाऊसफुल्लसंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा