Advertisement

मुंबई सिटी एफसी संघात बिपीन सिंगचा समावेश


मुंबई सिटी एफसी संघात बिपीन सिंगचा समावेश
SHARES

मुंबई सिटी एफसी या इंडियन सुपर लीगमधील फ्रँचायझीनं अाता पुढील मोसमासाठी अापला संघ भक्कम करण्यासाठी सुरुवात केली अाहे. सध्या ट्रान्सफर विंडो सुरू असून मुंबई सिटीनं अापल्या संघात बिपीन सिंग याचा समावेश केला अाहे. मणिपूरमध्ये जन्मलेला अाणि मिडफिल्डर म्हणून खेळणारा बिपीन अाता मुंबई सिटीकडून अापले कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी सज्ज झाला अाहे.


पदार्पणालाच निराशा

मणिपूर इथं १० मार्च १९९५ रोजी जन्म झालेल्या बिपीन सिंगनं अाय-लीग या राष्ट्रीय स्पर्धेत २२ डिसेंबर २०१२ रोजी पदार्पण केलं होतं. पण शिलाँग लजाँग संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बिपीनला अांबेडकर स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ८१व्या मिनिटाला संधी मिळाली होती. पण या सामन्यात शिलाँग लजाँग संघ ०-३ असा पराभूत झाला होता.


या संघांचं केलं प्रतिनिधित्व

बिपीन सिंग त्यानंतर २०१२ ते २०१७ या पाच मोसमात शिलाँग लजाँगकडून खेळला. त्यानंतर २०१७-१८ मोसमाकरिता तो इंडियन सुपर लीगमध्ये अॅटलेटिको डी कोलकाता संघाकडून खेळला. प्लेयर्स ड्राफ्टनुसार तो यंदा मुंबई सिटी एफसीचे प्रतिनिधित्व करणार अाहे. मुंबई सिटी एफसीनं अापल्या ट्विटरवरून ही माहिती दिली अाहे.


हेही वाचा -

शिव्या घाला, टीका करा, या सुनील छेत्रीच्या भावनिक अावाहनानंतर मुंबईतील सामना हाऊसफुल्ल

बार्सिलोना, युव्हेंट्सचे देव मुंबईत अवतरणारRead this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा