• एक किलोचा किडनी स्टोन
SHARE

दहिसर - दृश्यांमध्ये तुम्हाला दिसणारा दगड एका माणसाच्या पोटातून काढला आहे तुमचा यावर विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. हा दगड दहिसरमध्ये राहणा-या एडवर्ड हार्डीडोना या वृद्धाच्या पोटातून काढलाय. एडवर्ड यांच्या पोटात दुखत असल्यानं त्यांंना वसईच्या इशान न्यूरोलॉजीस्ट अॅण्ड किडनी केयर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तपासणीनंतर त्यांच्या पोटात स्टोन असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यानंतर डॉक्टरांनी ऑपरेशनद्वारे जवळपास एक किलोचा दगड पोटातून काढला. ऑपरेशननंतर एडवर्ड यांची प्रकृती ठणठणीत आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या