Advertisement

धोका वाढला, राज्यात शुक्रवारी कोरोनाचे नवीन १०,२१६ रुग्ण

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. शुक्रवारी राज्यात १० हजार २१६ नवीन रुग्ण आढळले. गेल्या दोन महिन्यातील ही सर्वाधिक वाढ आहे.

धोका वाढला, राज्यात शुक्रवारी कोरोनाचे नवीन १०,२१६ रुग्ण
SHARES

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. शुक्रवारी राज्यात १० हजार २१६ नवीन रुग्ण आढळले. गेल्या दोन महिन्यातील ही सर्वाधिक वाढ आहे.

 शुक्रवारी ६ हजार ४६७ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर ५३ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली, आतापर्यंत ५२ हजार ३९३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर  एकूण २० लाख ५५ हजार ९५१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील मृत्यूदर २.३८ टक्के एवढा आहे.

 राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) सध्या ९३.५२ टक्के इतके आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ६६ लाख ८६ हजार ८८० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१ लाख ९८ हजार ३९९ (१३.१७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यातील होम क्वारंटाइन व्यक्तींची संख्या वाढत चालली असून ४ लाख १० हजार ४११ व्यक्ती सध्या होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर ४ हजार २०३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात ८८ हजार ८३८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

पुणे जिल्ह्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. ही संख्या १८ हजार ४०१ इतकी झाली आहे. त्यापाठोपाठ नागपूर जिल्ह्यात ११ हजार ५५२, ठाणे जिल्ह्यात ९ हजार ५७९ तर मुंबई पालिका हद्दीत ९ हजार ५५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा