Advertisement

पनवेल महापालिका हद्दीत सोमवारी १०४ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत सोमवारी ( २४ ऑगस्ट) १०४ नवीन कोरोना रुग्ण आढळले. तर चौघांचा मृत्यू झाला असून यामध्ये नवीन पनवेेलमधील ३ तर खारघरमधील एका रुग्णाचा समावेश आहे.

पनवेल महापालिका हद्दीत सोमवारी १०४ नवीन कोरोना रुग्ण
SHARES

पनवेल महापालिका हद्दीत सोमवारी ( २४ ऑगस्ट) १०४ नवीन कोरोना रुग्ण आढळले. तर चौघांचा मृत्यू झाला असून यामध्ये नवीन पनवेेलमधील ३ तर खारघरमधील एका रुग्णाचा समावेश आहे.  तब्बल २६४ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

 पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये कळंबोली-रोडपाली येथील ९, कामोठ्यातील १६, खांदा कॉलनीतील ३, खारघरमधील ४४, पनवेलमधील २१,  नवीन पनवेलमधील ६, तळोजा येथील ५ रुग्णाचा समावेश आहे. 

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण १०,५३८ कोरोनाबाधित रूग्णांपैकी ९१०७ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून २५८ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे ११७३ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत.



हेही वाचा - 

गुड न्यूज ! राज्यात आता वाहतुकीसाठी ई-पासची गरज नाही  

लोणावळ्याला जायचंय? पोलीस काय म्हणताहेत, वाचा…


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा