Advertisement

राज्यात रविवारी कोरोनाचे ११,१४१ नवे रुग्ण

राज्यात सलग चार दिवस १० हजारांच्यावर नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. रविवारी ११,१४१ नव्या कोरोना रुग्णांचं निदान झालं आहे.

राज्यात रविवारी कोरोनाचे ११,१४१ नवे रुग्ण
SHARES

राज्यात सलग चार दिवस १० हजारांच्यावर नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. रविवारी ११,१४१ नव्या कोरोना रुग्णांचं निदान झालं आहे. तर दिवसभरात ६०१३ रुग्ण बरे झाले आहेत. 

रविवारी  ३८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.३६ टक्के इतका आहे. राज्यात एकूण २०,६८,०४४  रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हीर रेट) ९३.१७ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,६८,६७,२८६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २२,१९,७२७ (१३.१६ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,३९,०५५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,६५० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ६८ लाख ६७ हजार २८६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २२ लाख १९ हजार ७२७ नमुने पॉझिटिव्ह निघाले आहेत. हे प्रमाण १३.१६ टक्के इतके आहे. सध्या राज्यात ४ लाख ३९ हजार ०५५ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत, तर ४ हजार ६५० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या ९७,९८३ इतकी झाली आहे. मुंबईत अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढली असून ती ९३१९ इतकी झाली आहे. तर ठाण्यात ही संख्या १० हजार २९४ इतकी. तर, पुण्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २० हजार ३४७, नाशिक येथे ४,७४१, अहमदनगर येथे १,८६९, औरंगाबाद येथे ४,२६४,६०४, नागपूर येथे ११ हजार ६३५, कोल्हापूर येथे ४८७ इतकी आहे. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा