बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, जून महिन्यात मुंबईत विविध साथीच्या आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. जून महिन्यात साथीच्या आजारांची 1,395 प्रकरणे आढळून आली आहेत.
यामध्ये गॅस्ट्रोचे (gastro) सर्वाधिक 722 रुग्ण आढळले आहेत. त्यात 443 ताप, 99 कावीळ, 93 डेंग्यू, 28 लेप्टो आणि 10 स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईत जानेवारी ते मे 2024 या कालावधीत विविध साथीच्या आजारांची सुमारे 5,697 प्रकरणे नोंदवली गेली. त्यात 3,478 गॅस्ट्रोचे रुग्ण आणि 1,612 सर्दी तापाचे रुग्ण आढळले आहेत.
साथीचे आजार (Epidemic diseases) रोखण्यासाठी यावर्षी एप्रिलपासून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्या होत्या. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत जून महिन्यात साथीच्या आजारांच्या रुग्णांमध्ये घट झाल्याचे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी दक्षा शहा यांनी सांगितले.
या गेल्या जून महिन्यात मुंबईत (mumbai) साथीच्या आजारांचे 1395 रुग्ण आढळून आले आहेत. मात्र गेल्या वर्षी जून महिन्यात साथीच्या आजारांचे 3012 रुग्ण आढळून आले होते. त्यामध्ये गॅस्ट्रोचे 1744, सर्दीचे 639, डेंग्यूचे 353, कावीळचे 141, लेप्टोचे 97, स्वाइन फ्लूचे 30, कांजण्यांचे 8 रुग्ण आढळून आले.
हेही वाचा