Advertisement

१६ कोरोनाबाधित महिलांना नायर रुग्णालयानं 'असा' दिला दिलासा


१६ कोरोनाबाधित महिलांना नायर रुग्णालयानं 'असा' दिला दिलासा
SHARES

कोरोनाची लागण झालेल्या १६ जणींची सुखरूप प्रसूती पालिकेच्या नायर रुग्णालयामध्ये करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या महिलांचे बाळ सुरक्षित व सुखरूप असून, रुग्णालयानं घेतलेल्या दक्षतेमुळं बाळाला कोरोनाची लागण झालेली नाही. कोरोनाच्या काळात अनेक महिलांचे प्रसूतीचे दिवस भरत आले आहेत, प्रसूती केव्हा होईल हे सांगता येत नाही, अशा अवस्थेमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेल्या अनेकजणींना नावनोंदणी केलेल्या प्रसूतिगृहांनी दाखल करून घेण्यास नकार दिला जात आहे.

काही खासगी रुग्णालयांनी संसर्ग झालेल्या गरोदर महिलांना दाखल करून घेण्यासाठी नकार दिला. यातल्या अनेकींनी ५ ते ६ रुग्णालयांमध्ये जाऊन मदतीची याचना केली, मात्र मदत मिळाली नाही. प्रसूती कशी थांबवणार, अशा परिस्थितीमध्ये कुठे जाणार, हा प्रश्न या महिलांपुढे होता. या गरोदर महिलांना नायर रुग्णालयाने आधार दिला. यातील १६ जणींची प्रसूती झाली असून त्यांची बाळेही सुखरूप आहेत.

आईला संसर्ग झाला असला तरी बाळांना कोरोनाची कोणतीही लक्षणं नाही आहे. हे केवळ रुग्णालयातील डॉक्टरांनी केलेले योग्य प्रकारचं नियोजन, तत्काळ उपलब्ध करून दिलेली मदत आणि प्रसूती जवळ आलेल्या गर्भवती मातांचे सातत्याने केलेल्या समुपदेशान यामुळे शक्य झाले. या महिलांसाठी स्वतंत्र वॉर्डही तयार करण्यात आला आहे.

या वॉर्डमध्ये एकूण ४५ जणींना दाखल करण्यात आले आहे. बाळाला कोणत्याही प्रकारचा वैद्यकीय त्रास झाला, तर त्यासाठी बालरोगतज्ज्ञांची टीमही उपस्थित आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा