Advertisement

पनवेल महापालिका हद्दीत सोमवारी १८८ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत सोमवारी (२८ सप्टेंबर) १८८ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून २५७ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

पनवेल महापालिका हद्दीत सोमवारी १८८ नवीन कोरोना रुग्ण
SHARES

पनवेल महापालिका हद्दीत सोमवारी (२८ सप्टेंबर) १८८ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून २५७ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तर ५ मृत्यूंची नोंद झाली असून यामध्ये कामोठ्यातील ३ तसेच नवीन पनवेल आणि खारघर येथील प्रत्येकी एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. 

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील १९, नवीन पनवेलमधील १७, खांदा काॅलनीतील १५, कळंबोली-रोडपाली येथील १९,  कामोठ्यातील ३८, खारघरमधील ७३, तळोजा येथील ४ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील ५५,  नवीन पनवेलमधील ५३, कळंबोली-रोडपाली येथील ४६, कामोठ्यातील ४४, खारघरमधील ५५,  तळोजा येथील ४ रुग्णांचा समावेश आहे. 

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण १८७९३ कोरोनाबाधित रूग्णांपैकी १६५१४ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ४१६ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे १८६३ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत. 



हेही वाचा -

मुंबईतील कोरोनामुक्तांचं प्रमाण ८२ टक्क्यांवर

लाॅकडाऊनचे उल्लघंन केल्याप्रकरणी राज्यात २ लाख गुन्हे दाखल



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा