Advertisement

पनवेल महापालिका हद्दीत बुधवारी १९० नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत बुधवारी (२६ ऑगस्ट) १९० नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. ५ जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये पनवेेलमधील २, तळोजा येथील २ तसेच खांदा कॉलनी येथील एका रुग्णाचा समावेश आहे.

पनवेल महापालिका हद्दीत बुधवारी १९० नवीन कोरोना रुग्ण
SHARES

पनवेल महापालिका हद्दीत बुधवारी (२६ ऑगस्ट) १९० नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. ५ जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये पनवेेलमधील २, तळोजा येथील २ तसेच खांदा कॉलनी येथील एका रुग्णाचा समावेश आहे. १७५ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.  

 पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये कळंबोली-रोडपाली येथील २९, कामोठ्यातील ५०, खांदा कॉलनीतील ६, खारघरमधील ५१, पनवेलमधील ३०,  नवीन पनवेलमधील १८, तळोजा येथील ६ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये कळंबोली-रोडपाली येथील ३६, कामोठ्यातील ४२, खांदा कॉलनीतील ३, खारघरमधील ३१, पनवेलमधील ३९,  नवीन पनवेलमधील २५, तळोजा येथील २ रुग्णांचा समावेश आहे. 

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण १०,७७१ कोरोना रूग्णांपैकी ९४५८ रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर २७१ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे १०४२ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत. 



हेही वाचा

मुंबई लाइव्ह इम्पॅक्ट, धोकादायक इमारतीतील रहिवाशांना पालिकेनं हलवलं

वसई विरारमधल्या बेकायदा बांधकाम करणाऱ्या बिल्डरांना पालिकेचा झटका



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा