Advertisement

पनवेल महापालिका हद्दीत मंगळवारी १९४ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत मंगळवारी (२२ सप्टेंबर) १९४ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले. २०७ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

पनवेल महापालिका हद्दीत मंगळवारी १९४ नवीन कोरोना रुग्ण
SHARES

पनवेल महापालिका हद्दीत मंगळवारी (२२ सप्टेंबर) १९४ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले. २०७ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तर ९ मृत्यूंची नोंद झाली असून यामध्ये कामोठ्यातील ३, खारघरमधील २ तसेच पनवेल, नवीन पनवेल, खांदा कॉलनी आणि वळवळी येथील प्रत्येकी एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. 

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील २१, नवीन पनवेलमधील ४१, खांदा कॉलनीतील ११, कळंबोली-रोडपाली येथील ४२,  कामोठ्यातील ४२, खारघरमधील ३५, तळोजा येथील २ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील ३४,  नवीन पनवेलमधील ५५, कळंबोली-रोडपाली येथील ३२, कामोठ्यातील ३८, खारघरमधील ४८ रुग्णांचा समावेश आहे. 

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण १६८८६ कोरोनाबाधित रूग्णांपैकी १४३९९ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ३८० जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे २१०७ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत. 



हेही वाचा

लक्षणं नसलेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्याचे पालिकेचे निर्देश, 'हे' आहे कारण

नवी मुंबईत महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत ५० टक्के वाढ



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा