Advertisement

पनवेल महापालिका हद्दीत सोमवारी २०९ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत सोमवारी (१४ सप्टेंबर) २०९ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर ३ मृत्यूंची नोंद झाली असून यामध्ये खारघरमधील २ आणि पनवेलमधील एका रुग्णाचा समावेश आहे.

पनवेल महापालिका हद्दीत सोमवारी २०९ नवीन कोरोना रुग्ण
SHARES

पनवेल महापालिका हद्दीत सोमवारी (१४ सप्टेंबर) २०९ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत.  तर ३ मृत्यूंची नोंद झाली असून यामध्ये खारघरमधील २ आणि पनवेलमधील एका रुग्णाचा समावेश आहे. १६९ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. 

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील ५२, नवीन पनवेलमधील ११, खांदा कॉलनीतील १४, कळंबोली-रोडपाली येथील २०, कामोठ्यातील ६४, खारघरमधील ४०,  तळोजा येथील ४ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील ५२,  नवीन पनवेलमधील २५, कळंबोली-रोडपाली येथील ३५, कामोठ्यातील २९, खारघरमधील २३,  तळोजा येथील ५ रुग्णांचा समावेश आहे.

 आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण १५१२० कोरोनाबाधित रूग्णांपैकी १२६८० रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ३४७ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे २०९३ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत. 



हेही वाचा -

राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं ‘या’ विषयावर पत्र

बलात्काराच्या गुन्ह्यात ‘या’ अभिनेत्याला पोलिसांनी केली अटक


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा