Advertisement

राज्यात सोमवारी कोरोनाचे २ हजार २१६ नवीन रुग्ण

राज्यात सोमवारी २२१६ नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर १५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील काही महिन्यांतील हा नीचांकी आकडा ठरला आहे.

राज्यात सोमवारी कोरोनाचे २ हजार २१६ नवीन रुग्ण
SHARES

राज्यात सोमवारी २२१६ नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर १५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील काही महिन्यांतील हा नीचांकी आकडा ठरला आहे. सोमवारी ३४२३ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर ९५.७३ टक्के झाला असून मृत्यूदरही कमी होत आहे.

सध्या राज्यातील मृत्युदर २.५१ टक्के इतका आहे. कोरोनाने आतापर्यंत ५१ हजार ३२५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत १९ लाख ५८ हजार ९७१  रुग्ण बरे झाले आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ५० लाख १० हजार ०३७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २० लाख ४६ हजार २८७ (१३.६३ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ६७ हजार ७६४ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर १ हजार ९७६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या सध्या ३४ हजार ७२० इतकी आहे. मुंबईत ही संख्या ५ हजार ३३८ इतकी आहे. तर, ठाण्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ६ हजार ४५९ इतकी सर्वाधिक आहे. पुण्यात ५ हजार ८२४,नाशिकला १०००, औरंगाबादला ६६६, नागपूर ३ हजार ५२१ इतके अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात सर्वात कमी अॅक्टिव्ह रुग्ण गडचिरोलीत आहेत. तेथे ही संख्या ५६ इतकी आहे.



हेही वाचा -

मंगळवारी व बुधवारी माटुंगा परिसरात पाणीपुरवठा बंद

मुंबईतील 'इतकी' खासगी रुग्णालये धोकादायक



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा