Advertisement

मुंबईतील 'इतकी' खासगी रुग्णालये धोकादायक

भंडारा येथील जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाच्या आगीच्या प्रकरणानंतर रुग्णालयांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मुंबईतील 'इतकी' खासगी रुग्णालये धोकादायक
SHARES

भंडारा येथील जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाच्या आगीच्या प्रकरणानंतर रुग्णालयांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या दृष्टीने महापालिकेनं शहरातील खासगी रुग्णालयांची अग्निशमन तपासणी करण्याचे आदेश दिले होते. यात ११ हजार ४९ खासगी रुग्णालयांची तपासणी केली. त्यानुसार, मुंबईतील ४० खासगी रुग्णालयं धोकादायक असल्याचं अग्निशमनच्या तपासणीत निदर्शनास आलं असून ३४२ रुग्णालयांमध्ये विविध स्वरूपाचे धोके आढळले आहेत. महापालिकेच्या अग्निशमन विभागानं मुंबईतील ११ हजार रुग्णालयांची तपासणी केली होती.

रुग्णालयांच्या रचनेसह सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर धोके असल्याचं ४० खासगी रुग्णालयांमध्ये आढळले, तर ३४२ रुग्णालयांमध्ये आग लागल्यास इमारतीबाहेर पडण्याच्या रस्त्यांमध्ये अडगळीच्या सामानामुळं जाण्यास रस्ता उपलब्ध नसणं, आग विझविण्याची साधनं उपलब्ध नसणं किंवा असल्यास त्यांची मुदत संपलेली असणं इत्यादी धोके दिसून आले. शहरातील ६३९ रुग्णालयांमध्ये काही किरकोळ दुरुस्ती करण्याचं आवश्यक असल्याचं या तपासणीतून समोर आलं. सुमारे ११ हजार रुग्णालयांपैकी १२८ रुग्णालये बंद होती.

मुंबईतील रुग्णालयांची अग्निसुरक्षेच्या दृष्टीनं तपासण्या करण्याची मागणी भंडाऱ्याच्या दुर्घटनेनंतर केली जात होती. अहमदाबादमध्ये कोरोना रुग्णालयात आग लागली होती, त्या घटनेनंतर सार्वजनिक रुग्णालयांच्या अग्निशमन विभागाच्या तपासण्या केल्या होत्या. यात किरकोळ दुरुस्त्या विभागानं सुचविल्या होत्या. याचा पाठपुरावा केला जात आहे. मात्र, खासगी रुग्णालयाच्या तपासण्या केल्या नसल्यानं तपासण्या करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा