Advertisement

मुंबईत 227 'बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' क्लिनिक सुरू होणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पालिकेच्या प्रत्येक वॉर्डात असे दवाखाने सुरू केले जातील.

मुंबईत 227 'बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' क्लिनिक सुरू होणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
SHARES

राज्याच्या आरोग्य क्षेत्रासाठी मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) यांनी महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यात सुमारे 700 ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली. आपला दवाखान्याच्या माध्यमातून नागरिकांना घराजवळ आरोग्य सुविधा देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगतानाच मुंबईत 227 ठिकाणी असे दवाखाने सुरू करण्यात येणार असून त्यापैकी 50 दवाखाने 2 ऑक्टोबरपासून सुरू झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आणि ग्रामीण रुग्णालयांच्या बळकटीकरणासाठी आरोग्य संस्थांचे श्रेणीवर्धन करण्यात येणार आहे. जेणे करून ग्रामीण भागातील नागरिकांना जर्जेदार आरोग्य सुविधा त्यांना स्थानिक पातळीवरच मिळू शकेल. सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेऊन आरोग्य संस्थांचे सक्षमीकरण केले जात आहे. प्रत्येक जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहेत.

आरोग्य क्षेत्रासाठी निधीची कमतरता भासणार नाही त्यासाठी दुप्पट निधी दिला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. खासगी संस्थांच्या मदतीने आरोग्याच्या पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात कॅथलॅब देखील सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या भागातील आरोग्य संस्थांचे काम 80 ते 90 टक्के पूर्ण झाले आहे तेथे निधी उपलब्ध करून ते काम शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी आणि नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे. ग्रामीण भागातील आरोग्याच्या क्षेत्रात आशा स्वयंसेविकांचे योगदान महत्वाचे आहे. 



हेही वाचा

डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिसच्या प्रकरणांमध्ये पुन्हा वाढ

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा