Advertisement

कल्याण डोंबिवलीत २२९ नवीन रुग्ण, ४ जणांचा मृत्यू

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात सोमवारी कोरोनाचे नवीन २२९ रुग्ण आढळले. तर ४ जणांचा मृत्यू झाला.

कल्याण डोंबिवलीत २२९ नवीन रुग्ण, ४ जणांचा मृत्यू
SHARES

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात सोमवारी कोरोनाचे नवीन २२९ रुग्ण आढळले. तर ४ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ३०३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ४६,४१६ झाली आहे. यामध्ये ३३७३ रुग्ण उपचार घेत असून ४२,१३५ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ९०८  जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नवीन २२९ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व ४८, कल्याण प ५८, डोंबिवली पूर्व ७७, डोंबिवली प २८,  मांडा टिटवाळा १४, मोहना  ३, तर पिसवली येथील एका रुग्णांचा समावेश आहे.

डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ६३ रुग्ण टाटा आमंत्रामधून, ३ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून, ६ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय,  ५ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून, २ रुग्ण आसरा फाउंडेशन स्कूलमधून, १ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.



हेही वाचा -  

खंडित वीज पुरवठ्यामुळे मुंबई विद्यापीठांच्या परीक्षा पुढे ढकलल्या

 मुंबईसाठी मोठा निर्णय! मेट्रो कारशेड आरेऐवजी कांजूरमार्गमध्ये होणार



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा