Advertisement

खंडित वीज पुरवठ्यामुळे मुंबई विद्यापीठांच्या परीक्षा पुढे ढकलल्या

संपूर्ण मुंबईचा वीज पुरवठा खंडीत झाला आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या परीक्षांवर देखील झाला आहे.

खंडित वीज पुरवठ्यामुळे मुंबई विद्यापीठांच्या परीक्षा पुढे ढकलल्या
SHARES

संपूर्ण मुंबईचा वीज पुरवठा खंडीत झाला आहे. याचा परिणाम रेल्वे सेवा, रुग्णालये आदींवर झाला आहे. याशिवाय याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या परीक्षांवर देखील झाला आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यानं मुंबई विद्यापीठाच्या आजच्या दिवसाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.

वीज पुरवठा खंडित झाल्यानं ऑनलाइन परीक्षांवर याचा परिणाम झाला आहे. मुंबई विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांमध्ये ऑनलाइन परीक्षा सुरू आहेत. या विद्यार्थ्यांना या खंडित वीजपुरवठ्यामुळे परीक्षा देता आलेली नाही. मात्र, विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये, त्यांना पुन्हा परीक्षा देता येईल, असं विद्यापीठ प्रशासनानं कळवलं आहे.

के. सी. कॉलेजच्या प्राध्यापका हेमलता बागले यांनी विद्यार्थ्यांना सुचित केलं आहे की, पदवी आणि पदवीत्तर परीक्षा १८ ऑक्टोबरला घेण्यात येतील. परीक्षेची वेळ तीच असेल. याशिवाय आणि एच. आर. कॉलेजनं देखील परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. पण यासंदर्भात मुंबई वद्यापीठानं अजूनही पुर्नपरीक्षा कधी घेण्यात येतील याची माहिती दिली नाही.

मुख्य समस्या कळव्यामध्ये असल्याचे समोर आले आहे. महापारेषणच्या ४०० KV कळवा पडघा GIS केंद्रात सर्किट १ मध्ये देखभाल-दुरुस्ती सुरू होती. यावेळी सर्व भार सर्किट २ वर होता. मात्र सर्किट २ मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्यानं मुंबई आणि ठाण्यातील बहुतांश भाग प्रभावित आहे.

मुंबई परिसरांतील गेलेला वीज पुरवठा साधारण पाऊन ते एक तासात पुर्वपदावर येईल अशी माहिती उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिली. मात्र सध्या सर्व लोकल गाड्या गेल्या अर्ध्यातासापासून एकाच जागेवर आहेत.

मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या बेस्ट इलेक्ट्रीकनें ट्वीट करून माहिती दिली आहे. 'टाटा इलेक्ट्रिककडून येणाऱ्या विद्युत पुरवठ्यात बिघाड झाल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.' अशी माहिती बेस्टनं दिली आहे. तसंच, झालेल्या गैरसोयीबद्दल बेस्टनं दिलगिरी व्यक्त केली आहे.



हेही वाचा

वीज पुरवठा खंडित झाल्यानं रुग्णालये व्हेंटिलेटरवर

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा