Advertisement

वीज पुरवठा खंडित झाल्यानं रुग्णालये व्हेंटिलेटरवर

वीज पुरवठा लवकर सुरळीत झाला नाही तर रुग्णालयातील रुग्णांवरही परिणाम होऊ शकतो.

वीज पुरवठा खंडित झाल्यानं रुग्णालये व्हेंटिलेटरवर
SHARES

संपूर्ण मुंबईचा वीज पुरवठा खंडीत झाला आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. वीज पुरवठा लवकर सुरळीत झाला नाही तर रुग्णालयातील रुग्णांवरही परिणाम होऊ शकतो. प्रत्येक रुग्णालयाचा विजेचा बॅकअप आणि जनरेटरच्या सुविधा असल्या तर त्या किती वेळ चालतील? असं प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. इक्बाल चहल यांनी सांगितलं की, सर्व रुग्णालयांनी कमीतकमी ८ तास डिझेलचा पुरेसा पुरवठा करण्यासाठी त्यांच्या संबंधित SWM ट्रान्सपोर्ट गॅरेज अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे.

आयसीयूमध्ये किंवा रुग्णालयांमध्ये कोणत्याही प्रकारचा वीज बिघाड होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. तसंच, आपत्ती नियंत्रण आणि CE M&E दोन तासांपेक्षा जास्त वेळ वीज पुरवठा खंडीत राहिल्यास MOBILE DG SET वाहनं पोहचवण्यासाठी सज्ज आहेत. त्यामुळे चिंता करण्याची गरज नसल्याचं आयुक्तांनी सांगितलं आहे.

दुसरीकडे, मुख्य समस्या कळव्यामध्ये असल्याचे समोर आले आहे. महापारेषणच्या ४०० KV कळवा पडघा GIS केंद्रात सर्किट १ मध्ये देखभाल-दुरुस्ती सुरू होती. यावेळी सर्व भार सर्किट २ वर होता. मात्र सर्किट २ मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्यानं मुंबई आणि ठाण्यातील बहुतांश भाग प्रभावित आहे.

मुंबई परिसरांतील गेलेला वीज पुरवठा साधारण पाऊन ते एक तासात पुर्वपदावर येईल अशी माहिती उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिली. मात्र सध्या सर्व लोकल गाड्या गेल्या अर्ध्यातासापासून एकाच जागेवर आहेत.

मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या बेस्ट इलेक्ट्रीकनें ट्वीट करून माहिती दिली आहे. 'टाटा इलेक्ट्रिककडून येणाऱ्या विद्युत पुरवठ्यात बिघाड झाल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.' अशी माहिती बेस्टनं दिली आहे. तसंच, झालेल्या गैरसोयीबद्दल बेस्टनं दिलगिरी व्यक्त केली आहे.



हेही वाचा

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा