Advertisement

पनवेल महापालिका हद्दीत शुक्रवारी २६० नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत शुक्रवारी ( २ ऑक्टोबर) २६० नवीन कोरोना रुग्ण आढळले असून २२८ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

पनवेल महापालिका हद्दीत शुक्रवारी २६० नवीन कोरोना रुग्ण
SHARES

पनवेल महापालिका हद्दीत शुक्रवारी ( २ ऑक्टोबर) २६० नवीन कोरोना रुग्ण आढळले असून २२८ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तसेच ४ मृत्यूंची नोंद झाली असून यामध्ये कळंबोलीतील २, पनवेल आणि कामोठे येथील प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश आहे. 

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील ५३, नवीन पनवेल २३, खांदा काॅलनी २७, कळंबोली २५, कामोठे ७४, खारघर ५०, तळोजा येथील ८ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील पनवेल ३१,   नवीन पनवेल ५६, कळंबोली १६, कामोठे ५३, खारघर ६७,  तळोजा येथील ६ रुग्णांचा समावेश आहे. 

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण १९७५१ कोरोनाबाधित रूग्णांपैकी १७४८३ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ४३६ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे १८३२ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत. 



हेही वाचा -

डॉक्टरांना कामाचे दिवस जास्त आणि क्वारंटाईनसाठी फक्त एक दिवस

अंधेरीतील 'त्या' इमारतीत २२ जणांना कोरोनाचा संसर्ग



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा