Advertisement

नवी मुंबईत मंगळवारी कोरोनाचे नवीन २६४ रुग्ण

नवी मुंबईत मंगळवारी (२२ सप्टेंबर) कोरोनाचे नवीन २६४ रुग्ण सापडले आहेत. तर ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नवी मुंबईत मंगळवारी कोरोनाचे नवीन २६४ रुग्ण
SHARES

नवी मुंबईत मंगळवारी (२२ सप्टेंबर) कोरोनाचे नवीन २६४ रुग्ण सापडले आहेत. तर ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता ३३,७५५ झाली आहे.

मंगळवारी बेलापूर ४९, नेरुळ ५३, वाशी ५६, तुर्भे २१, कोपरखैरणे ३२, घणसोली ३६, ऐरोली १३, दिघामध्ये ४ नवे रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात ३२३ जणांनी कोरोनावर मात केली आहे.  बेलापूर ६३, नेरुळ ५०, वाशी ५३, तुर्भे ४०, कोपरखैरणे ४४,  घणसोली २८, ऐरोली ३७, दिघामधील ८ बरे झाले आहेत.  बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २९५२७ झाली आहे. तर मृतांचा आकडा ७१० झाला आहे.

नवी मुंबईत सध्या ३५१८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ८७ टक्के झाला आहे. शहरात खासगी रुग्णालयातील करोना रुग्णांच्या देयकांच्या तक्रारी मोठय़ा प्रमाणावर वाढल्या आहेत. यासाठी पालिकेने पालिका मुख्यालयातील तळमजल्यावर विशेष तक्रार निवारण कक्ष स्थापन केला आहे. संपर्कासाठी ०२२२/ ७५६७३८९  किंवा ७२०८४९००१० या व्हॉटसअँप क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.


हेही वाचा -

लक्षणं नसलेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्याचे पालिकेचे निर्देश, 'हे' आहे कारण

नवी मुंबईत महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत ५० टक्के वाढ



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा