Advertisement

पनवेल महापालिका हद्दीत गुरूवारी २९९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत गुरूवारी (१७ सप्टेंबर) २९९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून २५२ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

पनवेल महापालिका हद्दीत गुरूवारी २९९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण
SHARES

पनवेल महापालिका हद्दीत गुरूवारी (१७ सप्टेंबर) २९९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून २५२ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तर ९ मृत्यूंची नोंद झाली असून यामध्ये कामोठ्यातील ३, नवीन पनवेलमधील २, खांदा कॉलनीतील २ आणि कळंबोलीतील २ रूग्णांचा समावेश आहे.  

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील ६३, नवीन पनवेलमधील ३५, खांदा कॉलनीतील १०, कळंबोली-रोडपाली येथील ३३,  कामोठ्यातील ५४, खारघरमधील ७६, तळोजा येथील ९ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील ४२,  नवीन पनवेलमधील ५५, कळंबोली-रोडपाली येथील ४२, कामोठ्यातील ६१, खारघरमधील ४४,  तळोजा येथील ८ रुग्णांचा समावेश आहे. 

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण १५८४१ कोरोनाबाधित रूग्णांपैकी १३२९८ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ३६५ जणांचा  मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे २१७८ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत. 



हेही वाचा

रशिया देणार भारताला कोरोना वॅक्सीनचे १०० दशलक्ष डोस

कोरोनामुळे ६४ डॉक्टर्स, १५५ आरोग्य कर्मचाऱ्यांचा मृत्यू, पण IMAची आकडेवारी वेगळी


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा