Advertisement

शहरात कोरोनाचा उद्रेक, मुंबईत ३२६०, कल्याण डोंबिवलीत ६८६ नवे रुग्ण

राज्यात शहरी भागात कोरोनाचा उद्रेक झाल्याचं पहायला मिळत आहे. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई. पनवेल आदी शहरांमध्ये रोज आढळणारी नवीन कोरोना रुग्णांची संख्या मोठी आहे.

शहरात कोरोनाचा उद्रेक, मुंबईत ३२६०, कल्याण डोंबिवलीत ६८६ नवे रुग्ण
SHARES

राज्यात शहरी भागात कोरोनाचा उद्रेक झाल्याचं पहायला मिळत आहे. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई. पनवेल आदी शहरांमध्ये रोज आढळणारी नवीन कोरोना रुग्णांची संख्या मोठी आहे. सोमवारी मुंबईत ३२६०, ठाण्यात ५९०, कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात ६८६, नवी मुंबईत ४०४, तर पनवेलमध्ये ३०३ नवे रुग्ण सापडले आहेत. 

शहरांमध्ये वाढती रुग्णसंख्या चिंताजनक आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण येत आहे. मुंबईत सोमवारी १० रुग्णांचा मृत्यू झाला. तर १३२३ रुग्ण बरे झाले.  सध्या मुंबईत २५ हजार ३७२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ११ हजार ५९२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. २१ मार्चपर्यंत मुंबईत ३७ लाख ३० हजार ४५० कोरोना चाचण्या करण्यात आल्या. तर मुंबईत कोरोना रुग्णवाढीचा दर ९७ दिवसांवर गेला आहे.

ठाण्यात ५९० नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात रोज ५०० पेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत. सोमवारी ४ जणांचा मृत्यू झाला आहे. कल्याण डोंबिवलीत सोमवारी नव्या ६८६ रुग्णांची नोंद झाली आहे. तर २ रुग्णांचा मृत्यू झाला.  ४२३ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या कल्याण डोंबिवलीत ५१५५ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत कल्याण डोंबिवलीत ६४ हजार ८७७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.



हेही वाचा -

  1. थोडा दिलासा, राज्यात सोमवारी कोरोनाचे २४ हजार ६४५ नवे रुग्ण

  1. २४ तास लसीकरणाचा पर्याय महापालिकेच्या विचाराधीन

  2. धारावीत मार्च महिन्यात ६२ टक्के रुग्ण वाढले

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा