Advertisement

नवी मुंबईत गुरूवारी कोरोनाचे नवीन ३३० रुग्ण

नवी मुंबईत गुरूवारी (८ ऑक्टोबर) कोरोनाचे नवीन ३३० रुग्ण सापडले आहेत. तर ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नवी मुंबईत गुरूवारी कोरोनाचे नवीन ३३० रुग्ण
SHARES

नवी मुंबईत गुरूवारी (८ ऑक्टोबर) कोरोनाचे नवीन ३३० रुग्ण सापडले आहेत. तर ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता ३९,४२१ झाली आहे.

गुरूवारी बेलापूर ७४, नेरुळ ४३, वाशी ५१, तुर्भे ४७, कोपरखैरणे ४३, घणसोली २८, ऐरोली ३७, दिघामध्ये ७  नवे रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात ३३६ जणांनी कोरोनावर मात केली आहे.  बेलापूर ५७, नेरुळ ३१, वाशी ५६, तुर्भे ४२, कोपरखैरणे ५८,  घणसोली २४, ऐरोलीमधील ५१ रुग्ण बरे झाले आहेत.  

बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३४,९८० झाली आहे. तर मृतांचा आकडा ७९८ झाला आहे. नवी मुंबईत सध्या ३६४३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ८८ टक्के झाला आहे. 

शहरात खासगी रुग्णालयातील करोना रुग्णांच्या देयकांच्या तक्रारी मोठय़ा प्रमाणावर वाढल्या आहेत. यासाठी पालिकेने पालिका मुख्यालयातील तळमजल्यावर विशेष तक्रार निवारण कक्ष स्थापन केला आहे. संपर्कासाठी ०२२२/ ७५६७३८९  किंवा ७२०८४९००१० या व्हॉटसअँप क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.



हेही वाचा -

 प्रवाशांसाठी गुड न्यूज! ९ आॅक्टोबरपासून धावणार ‘या’ ५ विशेष एक्स्प्रेस

 मुंबईकरांनो सांभाळून रहा! येत्या २-३ दिवसांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता 



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा